VIDEO : आवाज खाली जैन धर्मगुरु संतापला, महिला बोलली तुमच्या धर्मात सांगितलय, ते सगळं मंदिराच्या आत..दादरमध्ये मनसेवाले नडले
"मला एक कळत नाही, याचा धर्म यांना सांगतो की, ज्यामुळे लोकांना त्रास होईल ती गोष्ट रस्त्यावर करा. हे यांची पाप झाकण्यासाठी कबुतरांना खायला घालणार. त्याचा त्रास सहन करायचा आम्ही" अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

जैन धर्मगुरुंच्या चालण्यासाठी जैन धर्मीयांनी रस्त्यावर पांढरी पट्टी मारली होती. त्यावरुन दादरमध्ये आज मोठ वाद झाला. मराठी भाषिकांच्या संतापाचा स्फोट झाला. लाइव्ह कॅमेऱ्यावर जैन धर्मगुरु आणि महिलांमध्ये वादावादी झाली. जैन धर्मगुरु कॅमेऱ्यासमोर बोलायला आले. त्यावेळी काही महिला आपले मुद्दे मांडत होत्या. त्याचवेळी जैन धर्मगुरुचा आवाजाचा पार चढला. आवाज खाली असं हा जैन धर्मगुरु संतापाने सांगत होता. महाराष्ट्रात धर्माचं नाटक चालणार नाही, मराठी माणसाचं चालणार असं महिला बोलत होत्या.
“तुम्ही धर्मगुरु, तुमच्या धर्मात हे शिकवतात का महिलांशी असं वागायचं, बोलायचं” असं एक महिला संतापाने बोलली.
“आतमध्ये बाथरुम नाही, कपडे वॉश केल्यावर पाणी रस्त्यावर टाकता. तुमच्या घरात टॉइलेट नाही. उद्या बोलाल, आमच्या धर्मात सांगितलय. तुमच्या धर्मात जे सांगितलय, ते जैन मंदिराच्या आत, रस्त्यावर चालणार नाही. खूप दादागिरी चालू आहे यांची, हे थांबलं पाहिजे” असं ही महिला सांगत होती.
तो गैरसमज आम्हाला दूर करावा लागेल
“कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही. मूळात पांढऱ्या पट्टया अगोदर दोन वर्ष मारल्या म्हणून ते बरोबर आहे. असं कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आम्हाला दूर करावा लागेल. मी आधी दोन खून केलेत मग अजून एक खून केला तर काय बिघडलं, अशा प्रकारचा युक्तीवाद झाला तो” असं संदीप देशपांडे म्हणाले.
मलं, मूत्र रस्त्यावर आणून टाकणार का?
“अशा गोष्टी सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेणार नाही. धर्म सांगतो म्हणून मलं, मूत्र रस्त्यावर आणून टाकणार का?. हे असले धंदे खपवून घेणार नाही. महापालिकेला हेच सांगणं आहे की, पोलिसात तुम्ही तक्रार दाखल करा. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा” असं संदीप देशपांडे म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात पांढरी पट्टी काढण्यात आली होती. त्यावरुन संदीप देशपांडे यांनी इशारा दिला. दुपारी 3 पर्यंतची वेळ दिली होती. 3 पर्यंत पांढरी पट्टी काढा नाहीतर मनसे स्टाइलने उत्तर देऊ. त्यानंतर महापालिकेकडून पांढरी पट्टी हटवण्याचं काम सुरु झालं.