AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laxman Hake: हे तर मर्सिडीजला नांगर जुंपण्यासारखंच… रोहित पवारांच्या आंदोलनावर लक्ष्मण हाकेंची टीकेची झोड, जरांगेंवरही मोठा हल्लाबोल

Laxman Hake on Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांचं संपूर्ण कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर आता सत्ताधारी गोटातून टीका होत असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुद्धा टीकेची झोड उठवली आहे.

Laxman Hake: हे तर मर्सिडीजला नांगर जुंपण्यासारखंच... रोहित पवारांच्या आंदोलनावर लक्ष्मण हाकेंची टीकेची झोड, जरांगेंवरही मोठा हल्लाबोल
लक्ष्मण हाके, रोहित पवारImage Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Jun 13, 2026 | 1:03 PM
Share

Laxman Hake on Rohit Pawar Agitation in Pandharpur: आमदार रोहित पवार यांनी सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर भाजप गोटातून मोठा हल्लाबोल सुरू झाला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी हे आंदोलन नौटंकी असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी तर खवचट टीका केला. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रोहित पवारांच्या आंदोलनावर टीकेची झोड उठवली आहे.

आंदोलन स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

पवारांच्या कुटुंबातील माणूस शेतकर्‍यांच्या आंदोलना बसलाय. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की रोहित पवार यांच्या आंदोलन स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि त्यांना आठ-दहा दिवस बसू द्या अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली. शेतकऱ्यांच्या पोरांना भाषण करण्याची संधी द्या असं माझं रोहित पवारांना सांगणं आहे, तुमच्याच पक्षाचे प्रतिनिधी टिमकी वाजवणार असतील तर हे आंदोलन म्हणजे आयती गर्दी पाहिजे असेच आहे. विठ्ठलाचा भाविक खूप सुज्ञ आहे, यांनी शेतकरी उध्वस्त केला. कारखाने सहकार मोडीत काढला. तो भंगारमध्ये घातला. शिक्षण संस्थेमध्ये बाय लॉज करून 500 संस्थेच्या बॉडीवर पवार कुटुंबिय आहेत.अशा महाराष्ट्राच्या सातबारा व नाव देणारे पवार शेतकऱ्यांच्या बाजूने उपोषणाला बसणे बकऱ्याच्या लग्नामध्ये येणे आणि अक्षदा टाकणं असे आहे. हे आंदोलन मर्सिडीजला नांगर जुंपण्यासारखंच आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका

मनोज जरांगे हे राजकारण करत आहेत. कुठल्यातरी अजेंड्यावर काम करत आहेत. त्यांच्या मागण्या कधीच संपणार नाहीत, किती जीआर काढले तरी. पंचायती राज मधले ओबीसीचे नेतृत्व संपलं आहे. ओबीसी उध्वस्त झाले आहेत. मनोज जरांगेचे आंदोलन संपणार नाही, मनोज जरांगे यांना सांगणं आहे की त्यांना एखादा पक्ष काढावा आणि रिंगणात यावं. त्यांना राजकारण करण्याची मोठी खूमखूमी आहे. ओबीसींच्या अन्नात माती कालवून तुम्ही राजकारण करू शकत नाही. आता ओबीसींचे आरक्षण संपले हे आम्ही दाखवून देऊ, असे हाके म्हणाले. महाराष्ट्रात 60 टक्के असलेला ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला असं तिथून बेदखल करण्यासाठी ओबीसी बांधव मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. . जरांगे यांच्या मागण्या बेकायदेशीर आहेत. कुणबीची नोंद सापडली हे ठरवण्याचा अधिकार शासनाला कोणी दिला? हे अधिकार स्टेट बॅकवर्ड अधिकारी आहेत, असे हाके म्हणाले.

हे पुणे परिसरामध्ये एक दाखला काढणे म्हणजे काय बेकायदा डॉक्युमेंट जोडणे कुठल्या वंशवळी नसताना नाशिक जिल्ह्याची वंशावळ पुण्यात अशा कुठल्याही कुठे जोडल्या गेल्यात वंशावळी जोडणारा माणूस लखपती झाला आहे. मी पूर्ण दाव्यानिशी सांगतोय ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा हा कुटील डाव आहे, असा आरोप हाके यांनी केला आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार