तिच्या नशिबात मृत्यूच नव्हता, नवविवाहीतेनं 10 व्या मजल्यावरून उडी मारली पण.., वाचा काय घडलं?

मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नवविवाहितेनं दहाव्या मजल्यावरून उडी मारली, मात्र पुढे ही महिला आश्चर्यकारकरित्या वाचली आहे. ही घटना भांडूपमध्ये बुधवारी घडली.

तिच्या नशिबात मृत्यूच नव्हता, नवविवाहीतेनं 10 व्या मजल्यावरून उडी मारली पण.., वाचा काय घडलं?
Crime News
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 27, 2026 | 3:57 PM

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 26 वर्षांच्या महिलेनं दहाव्या मजल्यावरून उडी मारली, मात्र त्यानंतर ती झाडाला अडकल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास भांडूपमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा चारच महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या महिलेनं दहाव्या मजल्यावरील खिडकीतून खाली उडी मारली, मात्र त्यानंतर ती एका झाडाला अडकली, त्यामुळे तिचा जीव वाचला आहे. मात्र या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने झाडाला अडकलेल्या या महिलेची अथक प्रयत्नानंतर सुटका केली, तिला झाडावरून खाली उतरवल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुरुवातीला या महिलेला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर तिला आता पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये तिच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी आतापर्यंत या महिलेचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं नाहीये, कारण सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिला बरं वाटल्यानंतर स्टेटमेंट रेकॉर्ड करून पुढील तपास सुरू केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेबाबत तिच्या आई-वडिलांना आणि तिच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. तिने उडी का मारली? याबाबत अजून कोणतंही कारण समोर आलेलं नाहीये.

चार महिन्यांपूर्वीच विवाह 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिलेचा चारच महिन्यापूर्वी विवाह झाला आहे. तिने दहाव्या मजल्यावरून उडी मारली, मात्र ती झाडाला अडकल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. तीने उडी का मारली? त्यामागे नेमकं काय कारण होतं? हे अजूनही अस्पष्ट आहे. या घटनेची माहिती या महिलेच्या नातेवाईकांना देण्यात आली असून, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Follow Us