
मोनोरेलवर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे मोनोरेल सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय एमएमआरडीने घेतला आहे. चेंबूर ते सात रस्ता अशी मोनोरेल सध्या चालवण्यात येत होती. या संपूर्ण भारतातील एकमेव असलेल्या मोनोरेलवर नादुरुस्त गाड्यांमुळे अलिकडे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे अपग्रेडेशन साठी ही सेवा आता २० सप्टेंबर २०२५ पासून काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोनोरेल अनेकवेळा अपघात झाले आहेत. अलिकडे १९ ऑगस्ट रोजी मोठा पाऊस पडल्याने सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास म्हैसूर कॉलनीजवळ मोनोरेल अडकली होती. यात ५८२ हून अधिक प्रवासी दोन ते तीन तास अडकले होते.अग्निशमन दलाने अखेर या प्रवाशांची सुटका केली. याच वेळी आचार्य अत्रे नगर स्थानकात आणखी एक मोनोरेल अडकली होती. त्यातून २०० प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मोनोरेल भारताची एकमेव मोनोरेल प्रणाली असून १९.७४ किमी मार्गावर संत गाडगे महाराज चौक ते चेंबूरपर्यंत ती चालवण्यात येते.
मोनोरेल बंद केल्यानंतर या ब्लॉक काळात तिचे भविष्यातील संचलन योग्य प्रकारे होण्यासाठी अनेक तांत्रिक काम केली जाणार आहेत. या मार्गावर नव्या गाड्यांचे परिचलन योग्य प्रकारे होण्यासाठी CBTC सिग्नलिंग प्रणाली अपग्रेड करण्यात येणार आहे. सध्या गाड्यांची डागडुजी केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षित आणि निर्धोकपणे वाहतू केली जाईल.
हैदराबाद येथे विकसित केलेली कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टीम (CBTC) या मोनोरेल मार्गावर प्रथमच बसवण्यात येणार आहे.
३२ जागांवर ५ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बसवण्यात आले असून त्यांची सध्या चाचणी सुरु आहे.
२६० वायफाय एक्सेस पाईंट, ५०० RFID Tags, ९० ट्रेन डिटेक्शन सिस्टीम आणि मल्टीपल WATC यापूर्वीच बसवले आहेत.
वेसाईड सिग्नलिंगची कामे पूर्ण झाली असून एकात्मिक तपासणी सुरु आहे.
एमएमआरडीने मेक इन इंडिया मोहिमे अंतर्गत मेधा कंपनीने SMH Rail च्या सहकार्याने तयार केलेल्या १० नव्या गाड्या खरेदी केल्या आहेत.
– त्यापैकी ८ गाड्या आल्या आहेत
– ९ वी गाडीचे इन्सपेक्शन होत आहे
– १० वी गाडीची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे