Abu Azmi : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष बोरिवली न्यायालयात! अबू आझमींनी महिलांविषयी केलं होतं आक्षेपार्ह वक्तव्य

| Updated on: Aug 20, 2022 | 4:10 PM

31 डिसेंबर 2016 रोजी बंगळुरूमध्ये अनेक महिलांचा विनयभंग करण्यात आला होता, त्यावर आझमी यांनी 3 दिवस महिलांवर अनेक आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या. महिला फक्त साडी आणि बुरख्यातच बऱ्या असतात असे अबू आझमी म्हणाले होते.

Abu Azmi : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष बोरिवली न्यायालयात! अबू आझमींनी महिलांविषयी केलं होतं आक्षेपार्ह वक्तव्य
अबू आझमी/स्वाती मालिवाल
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांच्याविरोधात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल आक्रमक झाल्या आहेत. स्वाती मालिवाल आज बोरिवली कोर्टात (Borivali court) आल्या होत्या. जिथे न्यायाधीशांसमोर त्यांचे म्हणणे नोंदवण्यात आले. पुढील सुनावणी 19 सप्टेंबर 2022 रोजी आहे. अबू आझमी यांनी 2017मध्ये महिलांविरोधात अश्लील टिप्पणी केली होती. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीवरून त्यांच्याविरोधात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला होता. 2017च्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, कर्नाटकातील बंगळुरू शहरात अनेक मुलींसोबत सामूहिक छेडछाडीची घटना समोर आली होती. या घटनेनंतर, आझमी यांनी प्रसारमाध्यमांमधून निंदनीय आणि चुकीची विधाने केली होती. स्वाती मालिवाल यांनी 2017मध्ये आझमी यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘कठोरात कठोर शिक्षा व्हावी’

31 डिसेंबर 2016 रोजी बंगळुरूमध्ये अनेक महिलांचा विनयभंग करण्यात आला होता, त्यावर आझमी यांनी 3 दिवस महिलांवर अनेक आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या. महिला फक्त साडी आणि बुरख्यातच बऱ्या असतात असे ते म्हणाले होते. आझमींनी तर पेट्रोल असेल तर आग लागेल, गूळ असेल तर मुंगी येईल, असेही म्हटले होते. असे वक्तव्य करून त्यांनी घटनेला जबाबदार असणाऱ्यांना प्रोत्साहन दिले होते. याविरोधात मालिवाल यांनी तक्रार दाखल केली होती. अशा मानसिक विचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. आपला न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालयाच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न आहे, असे त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

‘…तर तिच्यावर बलात्कार होणारच’

एखादी स्त्री रात्रीच्या वेळेस अनोळखी व्यक्तीसोबत बाहेर गेली, तर तिच्यावर बलात्कार होणारच. त्यांच्या विरोधात मी तक्रार केली होती. आज बोरिवली कोर्टाने मला बोलवले आहे. या केसमध्ये अबू आझमी यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, असे माझे मत आहे. जेणेकरून कोणताही नेता महिलांविरोधात बोलला तर त्यांना त्याची भिती वाटेल. 19 सप्टेंबर अशी दुसरी तारिख दिली आहे. कोर्टाने यावर निर्णय द्यायला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी मांडले. एकीकडे महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. तर दुसरीकडे नेतेच त्यांच्या भाषेतून अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळेल, असे वागत आहेत. त्यामुळे वादग्रस्त विधाने करणाऱ्या अबू आझमींवर कारवाईची त्यांनी अपेक्षा केली.