AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आकर्षक सजावट, भक्तिमय वातावरण अन्… नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील तीर्थक्षेत्र गजबजली, भक्तांच्या लांबच लांब रांगा

नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर आणि शेगावमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. पंढरपुरात २ टन फुलांची सजावट करण्यात आली असून साईनगरी आणि तुळजापूर भक्तांच्या जयघोषाने दुमदुमले आहे.

आकर्षक सजावट, भक्तिमय वातावरण अन्... नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील तीर्थक्षेत्र गजबजली, भक्तांच्या लांबच लांब रांगा
Tuljapur Pandharpur and Shegaon
| Updated on: Jan 01, 2026 | 8:24 AM
Share

देशभरात सरत्या वर्षाला निरोप देत २०२६ या नवीन वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रात अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे. नव्या वर्षाची सुरुवात देवाच्या दर्शनाने व्हावी यासाठी अनेक भाविकांनी महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांमध्ये गर्दी केली आहे. तसेच शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर आणि शेगाव यांसारख्या तीर्थक्षेत्रांवर भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.

पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नयनरम्य सजावट 

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नववर्षाच्या स्वागतासाठी नयनरम्य सजावट करण्यात आली आहे. आळंदी येथील विठ्ठल भक्त प्रदीपसिंह ठाकूर यांच्या वतीने सुमारे २ टन फुलांचा वापर करून मंदिराचा गाभारा, सोळखांबी आणि परिसर सजवण्यात आला आहे. ऑर्किड, गुलाब आणि झेंडू अशा १५ प्रकारच्या फुलांमुळे विठू माऊलीचे रूप अधिकच विलोभनीय दिसत आहे. हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मध्यरात्रीपासूनच साईनामाचा जयघोष

शिर्डीमध्ये काल मध्यरात्रीपासूनच साईनामाचा जयघोष ऐकू येत आहे. गेल्या २४ तासांत २ लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांच्या चरणी माथा टेकवला आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने रात्रभर दर्शन सुरू ठेवले होते. शिर्डीतील रस्ते, बाजारपेठा आणि मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेले आहेत.

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांचा अलोट पूर

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांचा अलोट पूर आला आहे. सध्या देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातून आलेल्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने बीडकर पायऱ्यांवरून दर्शनाची विशेष सोय केली आहे. तर विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी शेगाव संस्थानच्या वतीने रात्रभर मंदिर खुले ठेवण्यात आले होते. शिस्तबद्ध दर्शन आणि भक्तीमय वातावरणामुळे शेगावमध्ये नवीन वर्षाचा उत्साह ओसंडून वाहत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात नववर्षाचे स्वागत

दरम्यान या प्रमुख देवस्थानांसोबतच राज्यभरातील इतर स्थानिक मंदिरांमध्येही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच ठिकाणी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन, नवीन वर्षात सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना भाविक देवाच्या चरणी करताना दिसत आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरणात आणि प्रचंड उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात २०२६ या नववर्षाचे स्वागत केले जात आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.