उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस; राज्यातील जनतेलाही लस घेण्याचे आवाहन

ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांचा एकही डोस झाला नाही त्यांनी पहिला डोस तातडीने घ्यावा. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस; राज्यातील जनतेलाही लस घेण्याचे आवाहन
उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस
| Updated on: Jun 02, 2022 | 6:31 PM

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस (Buster Dose) घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. मुंबई येथील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर जे. जी. समुह रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले आहेत, त्या बुस्टर डोससाठी पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा.

त्यांनी पहिला डोस तातडीने घ्या

ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांचा एकही डोस झाला नाही त्यांनी पहिला डोस तातडीने घ्यावा. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

चिंता करण्याचे कारण नाही

सध्या मुंबईमध्ये कोरोना रुग्ण वाढत असले तरी त्यानुसार त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही असेही यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांनी बुस्टर डोस घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहेत.

कोरोना रुग्णांचा आकडा हजारावर

सध्या कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून बुधवारी राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हजारावर गेला होता. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. त्यांनी सांगितले की रुग्ण संख्या वाढत असली तरी आपल्याकडे रुग्णांवर केली जाणारी उपचार पद्धतीमुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले होते.