दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, नवाब मलिकांनी सुरुवात केली, प्रकरण अंतापर्यंत न्यावं लागेल, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांचा लवंगी फटाके लावून मोठा आवाज करण्याचा प्रयत्न केलाय, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, नवाब मलिकांनी सुरुवात केली, प्रकरण अंतापर्यंत न्यावं लागेल, देवेंद्र फडणवीसांचा इशारा
देवेंद्र फडणवीस
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 10:55 AM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी लवंगी फटाके लावून मोठा आवाज करण्याचा प्रयत्न केलाय, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. नवाब मलिक यांनी जो फोटो ट्विट केला आहे त्यासंदर्भात कालच रिव्हरमार्चच्या टीमनं त्यासंदर्भात स्पष्ट केलं आहे. तो व्यक्ती त्या संघटनेने हायर केलेला होता. रिव्हरमार्च ही संघटना नदी पुनरुज्जीवन करण्याचं काम करते. त्यावेळी मी आणि अमृता फडणवीस यांनी त्या व्यक्तीसोबत फोटो काढला होता. मात्र, जाणीवपूर्वक नवाब मलिकांनी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला.

शरद पवारांना पुरावे देणार

नवाब मलिकांचे जावई ड्रग्जसह सापडले आहेत. त्यांच्या पद्धतीनं निकष लावल्यास संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ड्रग्ज माफिया झाली पाहिजे. नवाब मलिक यांनी दिवाळीच्या लवंगी फटाका लावलाय. नवाब मलिकांनी लक्षात ठेवावं दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडेन. मी काचेच्या घरात राहत नाही,त्यामुळे मी या प्रकरणाचे सर्व पुरावे मांडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसी संबंध आहेत याचे पुरावे पाठवणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे प्रकरण अंतापर्यंत नेणार

नवाब मलिक यांनी सुरुवात केलीय तर मला आता हे प्रकरण अंतापर्यंत न्यावं लागेल. नवाब मलिक एनसीबीवर दबाव आणण्यासाठी हे काम करत आहेत. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत हास्यास्पद आहेत. नवाब मलिकांच्या जावयाला एनसीबीनं ड्रग्जसह अटक केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न नवाब मलिकांकडून केला जात आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा खेळ सुरु, नवाब मलिकांचा आरोप

समीर दाऊद वानखेडे जो गेल्या 14 वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये कामन करतोय त्यांच्याही बदलीमागे राज्याचे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना यासाठीच आणलं गेलं होतं की त्यांनी पल्बिसीटी करुन निर्दोष लोकांना फसवावं. ड्रग्जचा खेळ मुंबई, गोव्यात सुरु राहावा. मोठ मोठे ड्रग्ज पॅडलर्स मग तो काशिफ खान असो त्याला सोडलं जातं. ऋषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभाला सोडलं जातं. राज्यात सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

इतर बातम्या

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, शरद पवारांनाच पुरावे देणार, दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

Nawab Malik | ड्रग पेडलर जयदीप राणाशी फडणवीसांचे घनिष्ठ संबंध, नवाब मलिकांनी बॉम्ब फोडला

Devendra Fadnavis said Nawab Malik started this issue but i will end this drugs case issue