देवेंद्र फडणवीस यांनाच अंतर्मुख व्हावं लागेल, अंबादास दानवे यांचा टोला

आदित्य ठाकरे हे आज नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनाच अंतर्मुख व्हावं लागेल, अंबादास दानवे यांचा टोला
अंबादास दानवे यांचा टोला
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 11, 2022 | 2:36 PM

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना अंतर्मुख होण्याची गरज आहे, असं म्हटलं. यावर बोलताना ठाकरे गटाचे शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले, काही काळानं देवेंद्र फडणवीस यांना अंतर्मुख व्हावं लागेल.

अंबादास दानवे हे संजय राऊत यांच्या भेटीसाठी आले होते. आज प्रत्यक्ष अनुभव शेअर केल्याचं ते म्हणाले. देश, राज्याबद्दल चर्चा केली. काही किस्से शेअर केले. जुन्या गप्पा मारल्या. संज राऊत पुन्हा एकदा ताकदीनं लढा उभा करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

तेजस ठाकरे यांना राजकारणात सक्रिय करण्यात यावं, अशी मागणी होत असते. मला यातलं काही माहीत नाही. याबाबत तेच स्वतः निर्णय घेतील. मी त्याविषयी बोलण्याची आवश्यकता नाही, असंही दानवे म्हणाले.

संजय राऊत आल्यानंतर टीका सुरू केली आहे. किरीट सोमय्या म्हणतात, हिशोब घेणं बाकी आहे. याबाबत दानवे म्हणाले, देशात संजय राऊत यांची प्रतिमा लढाऊ नेता अशीचं आहे. राज्यात गद्दारी करून, ईडी, सीबीआयचा वापर करण्यात येतो. सत्तेचा दुरुपयोग केला जातो. संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं सांगितलं.

आदित्य ठाकरे हे आज नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेस सहभागी होत आहेत. मीसुद्धा त्यांच्यासोबत जाणार आहे. महाविकास आघाडी सातत्यानं जोडण्याचं काम करत आलंय. राहुल गांधी यांची संकल्पना चांगली आहे. त्यामुळं सहभागी होत असल्याचं दानवे यांनी म्हंटलंय.

संजय राऊत हे प्रेरणादायी नेते आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठीचं आलो होतो. अतिक्रमण कुठलाही असो ते काढलं गेलं पाहिजे, असंही अंबादास दानवे म्हणाले.