वरळीनंतर धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट, कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या उंबरठ्यावर

| Updated on: May 03, 2020 | 5:02 PM

धारावी परिसरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 500 च्या उंबरठ्यावर (Dharavi Corona Patient Update) पोहोचला आहे.

वरळीनंतर धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट, कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या उंबरठ्यावर
Follow us on

मुंबई : जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये (Dharavi Corona Patient Update) कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाच्या पायखालची वाळूच सरकली होती. अत्यंत दाटीवाटीने असलेली घरे, अस्वच्छता इत्यादींचे मोठे आव्हान मुंबई महापालिकेसमोर होते. धारावी परिसरातील एकूण रुग्ण संख्या 500 जवळ गेली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसात धारावीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

धारावी परिसरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 500 च्या उंबरठ्यावर (Dharavi Corona Patient Update) पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसात 127 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. काल एका दिवसात तब्बल 89 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे वरळीनंतर आता धारावी परिसर सर्वाधिक संवेदनशील विभाग बनला आहे.

धारावीमध्ये एकूण 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबई महापालिकेसह राज्य सरकारचीही झोप उडाली होती. आज (3 मे) 38 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीमधील कोरोनाबाधितांचा आकडा 496 वर पोहोचला आहे. यातील 18 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसात धारावीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

सोमवार ते शनिवार या सहा दिवसांमध्ये महापालिकेने आपले नऊ दवाखाने सुरु केले आहेत. याद्वारे ज्येष्ठ नागरिकांचा सर्व्हे केला जाणार आहे. तसेच 350 खासगी दवाखान्यांच्या मदतीने तब्बल 25 हजार लोकांची तपासणी करण्यात आली. यापैकी ताप, सर्दी, खोकला असलेल्या 1 हजार 920 लोकांची चाचणी तर 2 हजार 050 लोकांना क्वारंटाईन केले आहे. तर आतापर्यंत धारावी परिसरात 79 हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

तसेच 2 हजार 050 लोकांना धारावी पालिका शाळा, राजीव गांधी क्रीडा संकुल, मनोहर जोशी विद्यालय, माहीम नेचर पार्क येथे ठेवण्यात आले आहे.

मुंबई महापालिका मुंबईत कोरोनाचे आकडे वाढत असले तरी मृत्यूदर कसा कमी करता येईल याकडे जास्त लक्ष देत आहे. धारावीत गेले काही दिवस आकडे वेगाने वाढत आहे. गेल्या दोन दिवसात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत. पण एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू आलेला (Dharavi Corona Patient Update) नाही (Dharavi Corona Patient Update).

संबंधित बातम्या : 

पुण्याची रुग्णसंख्या दोन हजाराच्या उंबरठ्यावर, भवानी पेठेत 27 नवे कोरोनाग्रस्त, कोणत्या प्रभागात किती?

मद्यप्रेमींना दिलासा, महाराष्ट्रात ‘रेड झोन’मध्येही दारु विक्रीला सशर्त परवानगी