मद्यप्रेमींना दिलासा, महाराष्ट्रात ‘रेड झोन’मध्येही दारु विक्रीला सशर्त परवानगी

आता ग्रीन, ऑरेंज आणि रेड या तिन्ही झोनमध्ये, बाजारपेठा आणि मॉलमध्ये नसलेल्या अशा स्वतंत्र मद्यविक्री दुकानांना परवानगी मिळाली आहे.  (Liquor shops to open in Red Zone in Maharashtra)

मद्यप्रेमींना दिलासा, महाराष्ट्रात 'रेड झोन'मध्येही दारु विक्रीला सशर्त परवानगी

मुंबई : मुंबई-पुण्यासह ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील मद्यप्रेमींना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या  महाराष्ट्रातील जिल्ह्यात उद्यापासून मद्य विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी यासंदर्भात माहिती दिली. (Liquor shops to open in Red Zone in Maharashtra)

‘कोरोना’चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह 14 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये आहेत. सुरुवातीला केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्य विक्रीला सशर्त परवानगी होती, मात्र आता ग्रीन, ऑरेंज आणि रेड या तिन्ही झोनमध्ये, बाजारपेठा आणि मॉलमध्ये नसलेल्या अशा स्वतंत्र मद्यविक्री दुकानांना परवानगी मिळाली आहे.

मद्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना एकमेकांपासून सहा फुटांचे अंतर राखावे लागणार आहे. तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात नसतील, याची खबरदारी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र ) तूर्तास मद्यविक्रीला अजिबात परवानगी नाही. प्रत्येक लेनमध्ये फक्त पाच दुकाने (जीवनावश्यक दुकाने वगळता) उघडली जाऊ शकतात. जीवनावश्यक दुकानांच्या संख्येवर मात्र बंधन नाही.

हेही वाचा : Lockdown – 3 : ब्युटी पार्लर आणि सलूनबाबत गृहमंत्रालयाची नियमावली जारी

‘रेड झोन’मध्ये बांधकामांनाही परवानगी मिळाल्याने रखडलेल्या प्रकल्पांना पुन्हा गती मिळणार आहे. मात्र प्रतिबंधित क्षेत्रात बांधकामांना तूर्तास परवानगी नाही. (Liquor shops to open in Red Zone in Maharashtra)

रेड झोन (14) :

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव

ऑरेंज झोन (16) :

रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड

ग्रीन झोन (6) :

उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा

Published On - 4:03 pm, Sun, 3 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI