तीन मेनंतर झोननुसार मोकळीक, कोणते जिल्हे कोणत्या झोनमध्ये?

तीन तारखेनंतर प्रत्येक झोनमध्ये मोकळीक देऊ, मात्र घाई-गडबड करू नका, अन्यथा सर्व तपश्चर्या वाया जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं (Maharashtra Districts Red Orange Green Zone)

तीन मेनंतर झोननुसार मोकळीक, कोणते जिल्हे कोणत्या झोनमध्ये?
Follow us
| Updated on: May 01, 2020 | 2:47 PM

मुंबई : तीन मेनंतर आपण झोननुसार आतापेक्षा अधिक मोकळीक देणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. रेड झोनमध्ये काळजी घ्यावी लागेल. रेड झोनमध्ये शिथीलता शक्य होणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. (Maharashtra Districts Red Orange Green Zone)

रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी, ऑरेंज झोन म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी, तर ग्रीन म्हणजे इथे काही होण्याची शक्यता नसलेला ज्वालामुखी. पण तिथे गाफील राहता येणार नाही. मुंबई आणि शेजारचा परिसर, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासारख्या रेड झोनमध्ये काही करणं आता हिताचं नाही. ऑरेंज झोनमधली काही जिल्ह्यांमध्ये काय करु शकतो याचा विचार सुरु आहे. ग्रीन झोनमधल्या अटी-शर्ती हळूहळू काढत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शेती-शेतकऱ्यांवर कोणतंही बंधन नाही. बी बियाणे, शेती जशी चालू आहे, तशीच चालू राहील. मालवाहतूक सुरु केली आहे. हळूहळू बंधनं उठवत आहोत. पण झुंबड झाली तर पुन्हा बंधनं टाकावी लागतील, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

तीन तारखेनंतर प्रत्येक झोनमध्ये मोकळीक देऊ, मात्र घाई-गडबड करू नका, अन्यथा सर्व तपश्चर्या वाया जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. इतर राज्यात जी आपली लोकं त्यांना आपण इथे आणणार आहोत. काही लोकं गावी पर्यटनाला, कामसाठी गेले होते ते लॉकडाऊनमुळे तिथेच अडकून आहेत त्यांना सुद्धा लवकरच विचार करुन इथे आणले जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कोणते जिल्हे कोणत्या झोनमध्ये? 

रेड झोन (14) :

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव

ऑरेंज झोन (16) :

रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड

ग्रीन झोन (6) :

उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा

(Maharashtra Districts Red Orange Green Zone)

संबंधित बातम्या :

Maharashtra LockDown | 3 मेनंतर प्रत्येक झोनप्रमाणे मोकळीक देऊ, पण झुंबड नको : मुख्यमंत्री

(Maharashtra Districts Red Orange Green Zone)

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.