Maharashtra LockDown | 3 मेनंतर प्रत्येक झोनप्रमाणे मोकळीक देऊ, पण झुंबड नको : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत जनतेशी (CM Uddhav Thackeray on Lockdown three ) संवाद साधला.

Maharashtra LockDown | 3 मेनंतर प्रत्येक झोनप्रमाणे मोकळीक देऊ, पण झुंबड नको : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: May 01, 2020 | 2:07 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत जनतेशी (CM Uddhav Thackeray on Lockdown ) संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणून हुतात्म्यांना वंदन करताना मनात आलेल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन आहे, सर्वांना शुभेच्छा, आजच्या या दिनी महाराष्ट्र लढ्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांची आठवण येते, असं त्यांनी नमूद केलं. (CM Uddhav Thackeray on Lockdown )

जनता ही राज्य आणि देशाची संपत्ती आहे. तीन मे नंतर लॉकडाऊनचं काय हा प्रश्न विचारला जात आहे. त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. अर्थचक्र रुतलं मान्य, पण तुम्ही सगळे नागरिक ही राज्याची संपत्ती आहे. जनता वाचली पाहिजे, तुम्ही सगळे सैनिक आहात.   रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन आहेत, मुंबई आणि परिसर, पुणे आणि आसपासचा भाग, नागपूर, औरंगाबाद हे रेड झोन, ऑरेंजमध्ये काळजी, ग्रीनमध्ये अटी-शर्तींसह व्यवहारांना परवागनी दिली आहे.

मुंबई आणि शेजारचा परिसर, पुणे, नागपूर यासारख्या रेड झोनमध्ये काही करणं आता हिताचं नाही. ऑरेंज झोनमधली काही जिल्ह्यांमध्ये काय करु शकतो याचा विचार सुरु आहे. ग्रीन झोनमधल्या अटी-शर्ती हळूहळू काढत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

शेती-शेतकऱ्यांवर कोणतंही बंधन नाही. बी बियाणे, शेती जशी चालू आहे, तशीच चालू राहील. मालवाहतूक सुरु केली आहे. हळूहळू बंधनं उठवत आहोत. पण झुंबड झाली तर पुन्हा बंधनं टाकावी लागेल. ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन आहेत. रेड झोनमध्ये काळजी घ्यावी लागेल. रेड झोनमध्ये शिथीलता शक्य होणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

तीन तारखेनंतर आपण आतापेक्षा अधिक मोकळीक देणार आहोत, झोननुसार मोकळीक दिली जाईल, पण झुंबड नको, अन्यथा पुन्हा बंधनं टाकावी लागतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तीन तारखेनंतर प्रत्येक झोनमध्ये मोकळीक देऊ, मात्र घाई-गडबड करू नका, अन्यथा सर्व तपश्चर्या वाया जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

कोणत्याही परिस्थितीत शेती संबंधित कामावर आपण कोणतेही बंधन टाकले नाही, कृषीमालावर बंधन नाही, माल वाहतूक मोकळी आहे. हळूहळू बंधन उठवत आहोत. रेड झोनमध्ये खूप काळजी घेत आहोत. प्रत्येक पाऊल सावधतेने टाकत आहे. फिव्हर क्लिनिकसाठी आपण आयुर्वेदिक, होमिओपॅथी डॉक्टारांची मदत घेत आहे.

मुंबई आणि कल्याण डोंबिवलीच्या महापौरांनी पुन्हा परिचारिका म्हणून काम करण्याची तयारी दाखवली आहे. वीस हजार कोविड योद्धे तयार, त्यापैकी दहा हजार योद्ध्यांना प्रशिक्षण देत आहोत.

प्रत्येक राज्याची देशाची खरी संपत्ती ही तेथील नागरिक असते. तुम्ही सर्व सैनिक आहात. राज्यात रेड झोन , ऑरेंज झोन, ग्रीन झोन आहेत. जिथे रोड झोन आकडे वाढत आहेत, ग्रीन झोनमधील आपण अटी हळू हळू काढत आहे.

इतर राज्यात जी आपली लोकं त्यांना आपण इथे आणणार आहोत. काही लोकं गावी पर्यटनाला, कामसाठी गेले होते ते लॉकडाऊनमुळे तिथेच अडकून आहेत त्यांना सुद्धा लवकरच विचार करुन इथे आणले जाईल.

परप्रांतीय मजूर त्यांना त्यांच्या राज्यात परत पोहचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासोबत आपले काही लोकं इतर राज्यात अडकले आहेत. त्यांनाही ने-आण करण्याची व्यवस्था करत आहे.

वेळेत जर कुणी समोर आले तर तो रुग्ण बरा होऊ शकतो. 6  महिन्यापासून ते 85 वर्षांच्या आजीबाई सुद्धा बऱ्या होत आहेत. हे मी सर्वांना आधीपासून सांगत आहे. कोरोना झाला म्हणजे संपले असे नाही, वेळेत पुढे या, ज्यांना ज्यांना लक्षणं दिसत असतील त्यांनी पुढे या आणि तपासणी करा.

आपण विशेष करुन झोपडपट्टीमध्ये घरोघरी जाऊन तपासणी ऑक्सिमिटरच्या मदतीने सर्वांची तपासणी करत आहे. आतापर्यंत दोन लाख लोकांची तपासणी केली आहे. यामध्ये कुणाला मधुमेह, ऑक्सिजन किंवा इतर काही आजार असतील याची तपासणी केली जाते. कारण मधुमेह, ऑक्सिजन कमी असेल अशा लोकांना विषाणूची लागण लगेच होऊ शकते.

ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा त्यांच्यात ऑक्सिजन कमी असेल अशा लोकांवर महापालिकेकडून त्या आजारासंबंधित उपाचरही केले जात आहेत.

आतापर्यंत जेवढे रुग्ण आपल्याला सापडत आहेत, त्यामध्ये 75 टक्के लोकांना सौम्य लक्षणं, तर काहींना लक्षण नसल्याचे समोर आले आहेत. जे पॉझिटिव्ह आहेत त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

कोणते जिल्हे कोणत्या झोनमध्ये?

रेड झोन (14) : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर

tv9marathi.com

ऑरेंज झोन (16) रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड

ग्रीन झोन (6)उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा,

उद्धव ठाकरे यांचे महत्त्वाचे मुद्दे

  • हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन धुमधडाक्यात साजरा करण्याचं आधी ठरवलं होतं, पण आता नाईलाज आहे, आजही मी तोंडावर मास्क लावून अभिवादन केलं
  • लतादीदींनी 2010 मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी बीकेसीतील मैदानात ‘बहु असोत सुंदर’ गायल्याची आठवण जागी, आज त्याच जागी कोविड रुग्णांसाठी उपचार केंद्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह
  • संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी गोरेगावमध्ये रक्तदान शिबीर घेतलं होतं, आज त्याच जागी अनेक रुग्णशय्या तयार आहेत
  • लॉकडाऊन म्हणजे टाळेबंदी नाही, तर गतिरोधक, सिंगापूरच्या पंतप्रधानांनी सर्किट ब्रेकर शब्द वापरला, आपण कोरोनाची साखळी तोडली नसती तर आकडा कितीतरी वाढला असता : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह
  • हिंगोलीमध्ये पोलीस जवानांना कोरोनाची लागण, पण सर्व जणांवर विलगीकरण कक्षात उपचार, अद्यापही 75 ते 80 टक्के रुग्ण सौम्य, अतिसौम्य लक्षणं असलेले, काळजी घेतली नाही, तर ते कोरोनाचे वाहक ठरण्याची भीती
  • ऑक्सिमीटरच्या मदतीने दोन लाख तपासण्या, 272 जणांमध्ये ऑक्सिजन मात्रा कमी किंवा इतर व्याधी असलेले सापडले
  • मुंबई आणि कल्याण डोंबिवलीच्या महापौरांनी पुन्हा परिचारिका म्हणून काम करण्याची तयारी दाखवली, वीस हजार कोविड योद्धे तयार, त्यापैकी दहा हजार योद्ध्यांना प्रशिक्षण देत आहोत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह
  • फिव्हर क्लिनिकमध्ये वेळेमध्ये या, लक्षण दिसलं तर अंगावर काढू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह
  • परराज्यातील मजूर, पर्यटक यांना ने-आण करण्याची व्यवस्था करत आहोत, शेतीवर कोणतेही बंधन नाही, कृषीमालावर काहीही अट नाही, मात्र झुंबड करू नका, अन्यथा पुन्हा बंधन टाकावी लागतील

Non Stop LIVE Update
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.