केवळ RSS आणि अन्य संस्थांमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण, नितेश राणेंचा दावा

| Updated on: Jul 11, 2020 | 2:37 PM

धारावीतील रुग्णसंख्या ही महाराष्ट्र सरकारमुळे नाही तर RSS आणि अन्य संस्थांच्या कामामुळे नियंत्रणात आली, असा दावा नितेश राणे यांनी केला. Dharavi corona free

केवळ RSS आणि अन्य संस्थांमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण, नितेश राणेंचा दावा
नितेश राणे, भाजप आमदार
Follow us on

मुंबई : धारावीतील कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवल्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)घेतली आहे. मात्र धारावीतील कोरोना रुग्णसंख्या ही महाराष्ट्र सरकारमुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि अन्य संस्थांच्या कामामुळे नियंत्रणात आली, असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. WHO ने राज्य सरकारला उगाचच याचं श्रेय देऊ नये, असं नितेश राणे म्हणाले. (Dharavi corona free due to RSS efforts claim Nitesh Rane )

“आरएसएस आणि अन्य समाजसेवी संघटनांनी धारावीत दिवसरात्र मेहनतर करुन मदत केली, तिथल्या लोकांची जनजागृती केली. धारावी कोरोना रुग्ण घटण्याचं एकमेव कारण म्हणजे RSS आणि अन्य संस्था आहेत. महाराष्ट्र सरकारचं काहीही योगदान नाही. WHO ने उगाचचं याचं श्रेय महाराष्ट्र सरकारला देण्यापेक्षा खरं ज्यांनी मेहनत केली आहे, त्यांना दिलं असतं तर समाधान वाटलं असतं”, असं नितेश राणे म्हणाले.

WHO कडून धारावीची दखल 

“धारावी एक उदाहरण आहे की ज्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि सरकारने त्यावर नियंत्रण मिळविले”, असा कौतुकाचा वर्षाव वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस यांनी केला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मुंबईतील धारावी झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला होता. त्यामुळे दिवसाला मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत होते. पण येथील कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वॉर्ड ऑफिसर्स आणि धारावी, वरळीतील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना याचं श्रेय दिलं आहे.

(Dharavi corona free due to RSS efforts claim Nitesh Rane )

संबंधित बातम्या

धारावी झोपडपट्टीतील कोरोना संसर्गावर नियंत्रण, WHO कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक 

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीसाठी गुडन्यूज, रुग्णवाढीच्या वेगात कमालीची घट