Special Report : ठाकरे बंधूंमध्ये टोकाचं राजकारण, चिकन सूप आणि वड्यांचा वाद नेमका काय होता?

| Updated on: Dec 01, 2022 | 11:55 PM

सत्तातरानंतर शिंदे गट आणि भाजप नेत्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीवरुन तिखट प्रतिक्रिया दिलीय. मात्र परवाच्या सभेत खुद्द राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीवरुन निशाणा साधला.

Special Report : ठाकरे बंधूंमध्ये टोकाचं राजकारण, चिकन सूप आणि वड्यांचा वाद नेमका काय होता?
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मिमिक्री केली. आणि प्रकृतीवरुन टीका केल्यामुळे ठाकरे गटानंही त्यांना उत्तर दिलं. मात्र उत्तर देताना हा वाद याआधीच्या चिकन सूप आणि वड्यांच्या वादापर्यंत गेला. प्रकृतीवरुन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची नक्कल केली. आणि त्या नक्कलीवरुन पुन्हा ठाकरेंमधल्या टीकांचा वाद भूतकाळापर्यंत गेला. ज्यांनी कधीकाळी आजोबांचं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं जेवण काढलं होतं, त्यांच्यावर काय बोलायचं, असं उत्तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी दिलं.

चिकन सूप आणि वड्यांचा वाद नेमका काय होता? त्याआधी काल-परवाच्या भाषणावरुन वाद का सुरु झाला? सत्तातरानंतर शिंदे गट आणि भाजप नेत्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीवरुन तिखट प्रतिक्रिया दिलीय. मात्र परवाच्या सभेत खुद्द राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीवरुन निशाणा साधला.

याआधी मशिदीवरच्या भोंग्यावरुन मनसेनं बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरेंना घेरलं होतं.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचं ऐकणार की मग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं? असे प्रश्न मनसेनं विचारले होते. तोच वाद चिकन सूप आणि वड्याच्या वादापर्यंत गेला.

याआधीच्या मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये खंजीर खूपसण्यावरुन वाकयुद्ध झालं. आणि त्याच प्रचारात घरातले वाद जाहीर मंचावरुन बाहेर पडले. ईडीच्या कारवायांवरुनही दोन्ही ठाकरे बंधूंमधला वाद असाच विकोपाला गेला.

कधीकाळी मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये जवळीक वाढली होती, तेव्हा शिवसेनेनं राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या टीकांचा दाखला दिला होता. आता मनसेची जवळीक भाजपशी वाढलीय. त्यामुळे ठाकरे गटाकडून मनसेच्या याआधीच्या भूमिकांचे व्हिडीओ व्हायरल केले जातायत.