Vinayak Mete passes away : विनायक मेटेंच्या गाडीचा चालक एकनाथ कदमची होणार चौकशी, रसायनी पोलिसांनी घेतलं ताब्यात

| Updated on: Aug 14, 2022 | 12:34 PM

एकनाथ कदम याची वैद्यकीय तपासणी होणार आहे. रसायनी पोलीस या अपघाताचा तपास करत आहे. एकूण आठ पथके या संपूर्ण तपासासाठी तयार केली गेली आहेत.

Vinayak Mete passes away : विनायक मेटेंच्या गाडीचा चालक एकनाथ कदमची होणार चौकशी, रसायनी पोलिसांनी घेतलं ताब्यात
पोलीस अहवाल काय सांगतो?
Image Credit source: TV9marathi
Follow us on

मुंबई : विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची (Accidental death) आता चौकशी होणार आहे. विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकाची चौकशी होणार आहे. एकनाथ कदम असे या चालकाचे नाव आहे. एकूण आठ पथके तयार करण्यात आली आहेत. फॉरेन्सिकची टीमदेखील (Forensic team) यामध्ये असणार आहे. पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. एक ते दोन तास मदत मिळाली नाही, असे चालकाने सांगितले आहे. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ही गाडी कंटेनरला डाव्या बाजूने जोरदारपणे धडकली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. गाडीच्या डाव्या भागाचा चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, विनायक मेटे यांचे पार्थिव जे. जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे. याठिकाणी त्यांचे शवविच्छेदन केले जाईल. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर विनायक मेटेंच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. यावेळी विनायक मेटे (Vinayak Mete) अमर रहे, अशा घोषणाही देण्यात येत होत्या.

इतर सहकारी सुदैवाने बचावले

विनायक मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी चालक एकनाथ कदम याची चौकशी केली जाणार आहे. एकनाथ कदम याची वैद्यकीय तपासणी होणार आहे. रसायनी पोलीस या अपघाताचा तपास करत आहे. एकूण आठ पथके या संपूर्ण तपासासाठी तयार केली गेली आहेत. अजित पवार यांच्यासह विविध नेत्यांनी या अपघाताची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात झाली असून चालकाची चौकशी केली जाणार आहे. या दुर्घटनेत सुदैवाने चालक, पोलीस कर्मचारी तसेच गाडीतील इतर सहकारी बचावले आहेत. त्यांना दुखापती झाल्या आहेत, त्यामुळे सध्या रुग्णालयात दाखलही करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

आठ पथके तयार

रसायनी पोलिसांच्या ताब्यात

एकनाथ कदम हा मागील अनेक वर्षांपासून विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक म्हणून कार्यरत आहे. रात्रीच्या वेळी बीड येथून सर्वजण मुंबईकडे निघाले होते, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. तर चालकाने मद्यपान केले होते का, गाडी कशी धडकली, अपघात नेमका कशामुळे झाला, अशा विविध अंगांनी पोलीस तपास करणार आहेत. रसायनी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून तपासाअंती जबाब घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.