बेवड्याने मुंबई पोलिसांना फिरवले, मुलुंडमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन करून उडवली खळबळ

| Updated on: Mar 14, 2021 | 12:19 PM

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गुरुवारी रात्री एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने मुलुंड परिसरात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. | Mumbai police blast serial bomb blast

बेवड्याने मुंबई पोलिसांना फिरवले, मुलुंडमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन करून उडवली खळबळ
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गुरुवारी रात्री एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने मुलुंड परिसरात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले.
Follow us on

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी मिळाल्यानंतर मुंबईतील सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या होत्या. मात्र, या सतर्कपणामुळे गुरुवारी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) नाहक मनस्ताप सहन करावा लागला. (Mulund man held for making hoax call about serial blasts)

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गुरुवारी रात्री एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने मुलुंड परिसरात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने मुलुंडमध्ये सर्च ऑपरेशन सुरु केले. मात्र, तपासाअंती याठिकाणी पोलिसांना कोणताही बॉम्ब मिळाला नाही. अधिक चौकशी केल्यानंतर एका दारूड्याने मद्याच्या नशेत पोलिसांना फोन केल्याची माहिती समोर आली.

खोटा फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक

बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीचे नाव गणेश दिक्षीत असे आहे. तो सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. गणेश दिक्षीत याने पोलिसांना फोन करून आपण तीनजणांना मुलुंड परिसरात बाँम्बस्फोट घडवणार असल्याबाबत बोलताना ऐकल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी मुलुंडमध्ये सर्च ऑपरेशन राबवले होते.तपासात तथ्य आढळून न आल्याने नशा उतरल्यानंतर आरोपीकडे चौकशी केली असता त्याने नशेत फोन केल्याची कबुली दिल्याचे मुलुंड पोलिसांनी दिली.

सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा आरोप

मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना NIA कडून अटक करण्यात आली. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली, असा आरोप NIA नी केला आहे.

सचिन वाझेंवर कोणते आरोप?

स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या : 

पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला इशारा

गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा ; सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजप आणखी आक्रमक

(Mulund man held for making hoax call about serial blasts)