मुंबईत पावसाचा धुमाकूळ; मध्य रेल्वेवर एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोसमोर आल्या

सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. मुसळधार पावसामुळे एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोसमोर आल्या. मस्जिद आणि सैंडहर्स्ट रोड दरम्यान हा प्रकार घडला आहे. यामुळे एकच गोंधळ उडाला.

मुंबईत पावसाचा धुमाकूळ; मध्य रेल्वेवर एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोसमोर आल्या
| Updated on: Jun 30, 2022 | 11:29 PM

मुंबई : गुरुवारी सकाळपासूनच मुंबईत पावसाने( Central Railway) धुमाकूळ घातला आहे. धो धो कोसळणाऱ्या मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. रेल्वे प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेवर एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोसमोर आल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. सायन स्थानकाजवळ पाणी साचल्याने अनेक लोकल खोळंबल्या आहेत. तर, अनेक लोकल मध्येच थांबल्या आहेत.

सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. मुसळधार पावसामुळे एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोसमोर आल्या. मस्जिद आणि सैंडहर्स्ट रोड दरम्यान हा प्रकार घडला आहे. यामुळे एकच गोंधळ उडाला.

अंधेरीतही स्टेशनजवळ सखल भागात पाणी साचले आहे. अंधेरी सबवे मार्गावरून कोणत्याही वाहनांना जाऊ दिले जात नाही, वाहतूक पोलिसांनी भुयारी मार्ग अन्य मार्गाने वळवला आहे. दादर, हिंदमाता सह लोअर परळच्या जोशी रोड परिसरातील रस्त्यावर पाणी साचलेले आहे.