माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगात, आता मुलगा ऋषिकेशला ईडीचं समन्स, चौकशीचं शुक्लकाष्ठ संपेना!

| Updated on: Nov 05, 2021 | 7:18 AM

तुरुंगात दिवाळी साजरी करत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने समन्स बजावलं आहे. काल रात्री उशिरा त्यांना ईडीने समन्स बजावलं आहे. आज दिपावली पाडव्याच्या दिवशी त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आलं आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगात, आता मुलगा ऋषिकेशला ईडीचं समन्स, चौकशीचं शुक्लकाष्ठ संपेना!
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सचिन वाझेच्या वकिलाकडून चांदिवाल आयोगासमोर उलटतपासणी
Follow us on

मुंबई : तुरुंगात दिवाळी साजरी करत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने समन्स बजावलं आहे. काल रात्री उशिरा त्यांना ईडीने समन्स बजावलं आहे. आज दिपावली पाडव्याच्या दिवशी त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आलं आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कथित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे आरोप केले होते. याच घोटाळ्यावरुन त्यांना ईडीन अटक केलीय. पण या प्रकरणी आता मोठा ट्विस्ट आला आहे. देशमुख यांच्याविरोधात माझ्याकडे कुठलाही पुरावा नाहीय, असं चांदीवाल आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.

आज सकाळी 11 वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात ऋपिकेश देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. ईडीचे अधिकारी ऋषिकेश देशमुख यांची कसून चौकशी करतील. यादरम्यान त्यांना विविध प्रश्न विचारतील. त्यांच्याकडून अनेक प्रश्नांचा उलगडा होईल, असे प्रश्न ईडीचे अधिकारी ऋषिकेश यांना विचारतील.

देशमुख प्रकरणी मोठा ट्विस्ट

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाकडे परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोगाचं गठन केलं आहे. याच समितीसमोर परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात माझ्याकडे देशमुख यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाहीय, असं त्यांनी म्हटलंय.

अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगात

गेल्या अनेक दिवसांपासून गायब असणारे देशमुख 1 नोव्हेंबर रोजी अचानक ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास 13 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना ईडीने त्यांना अटक केली. न्यायालयानेही देशमुख यांना धक्का देत त्यांची रवानगी ईडी कोठडीत 6 नोव्हेंबरपर्यंत केली आहे. म्हणजेच दिवाळीचा संपूर्ण आठवडा त्यांना तुरुंगात काढावा लागणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गेल्या काही दिवसांपूर्वी पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुखांनी आम्हाला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली.

हे ही वाचा :

‘फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावं’, रोहित पवारांची खोचक टीका

देशातील भटक्या जमातींना ओबीसीबाहेर आरक्षण देण्याचा विचार सुरू, रामदास आठवलेंची माहिती