… तरच चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार : वर्षा गायकवाड

| Updated on: Jan 26, 2021 | 11:54 PM

बुधवारपासून (27 जानेवारी) पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे उर्वरित पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यावर देखील सरकार विचार करतंय.

... तरच चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार : वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरु होत आहे. नुकताच राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बुधवारपासून (27 जानेवारी) पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे उर्वरित पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यावर देखील सरकार विचार करतंय. मात्र, 5 वी ते 8 वीच्या वर्गांचा टप्पा यशस्वी झाल्यानंतरच चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार करू, असं महत्त्वाचं मत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलंय (Education Minister Varsha Gaikwad comment on opening of Schools in Maharashtra).

वर्षा गायकवाड म्हणाल्या, “विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच प्राथमिकता ठेऊन आम्ही तिसऱ्या टप्प्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करत आहोत. शिक्षकांच्या आरटीपीसीआर तपासण्या झाल्या आहेत. पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना मास्क बांधूनच पाठवावे. विद्यार्थ्यांनी स्वतःची पुस्तके स्वतःच हाताळावी. पूर्ण काळजी घेऊन हे वर्ग सुरु करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. हा टप्पा यशस्वी झाल्यानंतर चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा आम्ही विचार करू.”

दरम्यान, 27 जानेवारीपासून राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. शाळा सुरु करताना विद्यार्थी आणि शिक्षक यांनी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिल्या होत्या.

मुंबईतील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता 16 जानेवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत मुंबईतील शाळा आणि कॉलेज बंदच राहणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिलीय. मुंबई महानगरपालिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. मात्र तरीही अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट आणि इतर राज्याची परिस्थिती पाहता मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय 16 जानेवारी 2021 पासून बंद ठेवण्यात येणार आहे, असं मुंबई महापालिकेने आधीच जाहीर केलंय.

हेही वाचा :

Maharashtra Board Exam and Result Date 2021 : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ‘या’ दिवशी होणार

Maharashtra School reopens | राज्यातील शाळा याच महिन्यात सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना तारीख सांगितली

SSC-HSC EXAM Date | दहावीची परीक्षा 1 मे नंतर, तर 12 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर!

व्हिडीओ पाहा :

Education Minister Varsha Gaikwad comment on opening of Schools in Maharashtra