Farmer Loan Waiver: मोठी बातमी! कर्जमाफीची तिसर्‍या यादीची तारीख जाहीर, किती शेतकर्‍यांना लाभ?

Farmer Loan Waiver: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्जमाफीची तिसरी यादी लवकरच जाहीर होणार आहे. त्याची तारीख समोर आली आहे. किती शेतकर्‍यांना लाभ मिळेल?

Farmer Loan Waiver: मोठी बातमी! कर्जमाफीची तिसर्‍या यादीची तारीख जाहीर, किती शेतकर्‍यांना लाभ?
शेतकरी कर्जमाफी योजना तिसरी यादी
| Updated on: Sep 19, 2026 | 2:45 PM

Shetkari Karjmafi Yojana: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 विषयीची आनंदवार्ता समोर आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या दोन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आता तिसऱ्या यादीची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. तिसऱ्या यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांची पडताळणी अंतिम टप्प्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होऊन खाते निरंक होतील. काय आहे याविषयीची मोठी अपडेट?

5 लाख शेतकर्‍यांना 4 हजार कोटींची कर्जमाफी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत तिसऱ्या यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांची पडताळणी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यात शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील जवळपास 5 लाख शेतकर्‍यांना 4 हजार कोटींची कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार कर्जमाफीची अंमलबजावणी

शेतकरी कर्जमुक्ती योजना 2 जून 2026 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाली. त्यानंतर दोन टप्प्यात कर्जमाफीची प्रक्रिया राबवली गेली. पण तिसऱ्या टप्प्याला विलंब झाला. आता या टप्प्यात कर्जमाफीला मुहूर्त लागला आहे. मागील दोन याद्यांमध्ये सहा लाख शेतकऱ्यांना पाच हजार कोटी रुपयांची देण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल. पडताळा पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील. तक्रार निवारण, माहितीतील तफावत दूर करण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष यंत्रणा कार्यरत आहे.

32 लाख कर्जखात्यांची माहिती महाआयटी पोर्टलवर

कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता योजनेच्या अंमलबजावणीसाठी 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खासगी बँका अशा एकूण 53 बँकांनी 32 लाख कर्जखात्यांची माहिती महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. सहकार आयुक्तालयाने योजनेच्या निकषांनुसार, पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी 25 जुलै रोजी प्रसिद्ध केली होती. ऑगस्ट महिन्या अखेर 12 लाख 10 हजार कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कर्जमाफी प्राप्त शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीत कास्तकारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us