मोठी बातमी! विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

मोठी बातमी समोर येत आहे, विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी! विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 19, 2025 | 3:39 PM

मोठी बातमी समोर येत आहे, विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं समोर आलं आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले,  या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून, कोणतीही जीवीतहानी झालेली नाहीये.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे.  शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समोर आलं आहे, स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाला, त्यामुळे ही आग लागली, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे जेव्हा आग लागल्याची घटना घडली त्यावेळी आमदार देखील विधानभवनातच होते. एकीकडे आज विधानभवनात विविध समित्यांच्या उद्घाटनाचा क्रार्यक्रम सुरू आहे, तर दुसरीकडे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली, अग्निशमन दालाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. घटनास्थळी धुराचे लोट उठल्याचं पाहायला मिळालं.  खबरदारी म्हणून हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात आला आहे.

आज विधानभवनामध्ये विविध समित्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व आमदार उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजन भोजनासाठी विधानभवनात आले, याचदरम्यान ही आगीची घटना घडली आहे.

दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या आगीच्या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, विधानभवनाच्या स्वागत कक्षाच्या परिसरात ही आग  लागल्याची घटना घडली आहे. स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाला, त्यामुळे ही आग लागली. आगीचं स्वरुप छोटं होतं. या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आलं आहे, अशी माहिती यावेळी नार्वेकर यांनी दिली आहे. दरम्यान जेव्हा ही आगीची घटना घडली तेव्हा आमदार देखील विधानभवनातच होते. आज विविध समित्यांचं उद्घाटन असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील उपस्थिती होती.