मुंबईच्या अंधेरी परिसरात भीषण आग, धुराचे लोळ पाहून नागरिकांमध्ये घबराट

अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवरील स्टार बाजारजवळ ही आग लागली आहे. ही आग लेव्हल 2 ची आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुंबईच्या अंधेरी परिसरात भीषण आग, धुराचे लोळ पाहून नागरिकांमध्ये घबराट
| Updated on: Jul 29, 2022 | 5:24 PM

मुंबई : मुंबईच्या अंधेरी(Andheri) परिसरात भीषण आग(Fire) लागली आगे. सायंकाळी 4.30 च्या सुमारास अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवरील स्टार बाजारजवळ ही आग लागली आहे. ही आग लेव्हल 2 ची आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 1000 चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अद्याप यात कुणीही जखमी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. मात्र, दूरपर्यंत धुराचे लोळ दिसत असल्याचे नागरीक भयभित झाले आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.