कुर्ल्यातील कुख्यात गुंड जानू पवारवर गोळीबार

मुंबई : कुर्ला येथील हलावा पुलाजवळ कुख्यात गुंड जानू पवार उर्फ बिल्लावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात जानू पवार गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुंड जानू पवार याच्यावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाला असल्याची शक्यता कुर्ला पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी एक जणाला ताब्यात […]

कुर्ल्यातील कुख्यात गुंड जानू पवारवर गोळीबार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : कुर्ला येथील हलावा पुलाजवळ कुख्यात गुंड जानू पवार उर्फ बिल्लावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात जानू पवार गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुंड जानू पवार याच्यावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाला असल्याची शक्यता कुर्ला पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी एक जणाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

कुख्यात गुंड जानू पवारवर कुर्ला पोलीस स्थानकात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. नुकतेच तो एका खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता. मात्र याच दरम्यान त्याच्यावर गोळीबार करण्याची घटना घडली.

कुर्ला पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, गोळीबाराच्या घटनेची कसून चौकशी करत आहेत. तसेच, फॉरेन्सिकची टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली आहे.

कुर्ल्यातील हलावा पुल हा रहदारीचा परिसर आहे. दिवसा-ढवळ्या गोळीबार झाल्याने येथील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.