वाशिंद आसनगाव दरम्यान मालगाडीत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प

वाशिंद आसनगाव दरम्यान मालगाडीत बिघाड झाला आहे,

वाशिंद आसनगाव दरम्यान मालगाडीत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प
वाशिंद आसनगाव दरम्यान मालगाडीत बिघाड
Image Credit source: tv9
| Updated on: May 25, 2022 | 7:37 AM

कल्याण – वाशिंद आसनगाव (Asangaon) दरम्यान मालगाडीत बिघाड झाला आहे, त्यामुळे मध्य रेल्वेची (Central railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते कसारा (kalyan to kasara) मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. मालगाडीत बिघाड झाल्याने सकाळी कामावरती निघालेल्या प्रवाशांवरती त्याचा परिणाम झाला आहे. मध्य रल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सीएसटीकडे येणाऱ्या गाडी विलंबाने येत आहेत. विशेष म्हणजे मध्यरेल्वेची वाहतूक पुर्णपणे विस्कळीत झाली आहे.

मालगाडी वासिंद ते आसनगाव दरम्यान डाऊन मार्गावर थांबली

काही तांत्रिक समस्येमुळे मालगाडी वासिंद ते आसनगाव दरम्यान डाऊन मार्गावर थांबली आहे. मालगाडी सकाळी सहा वाजल्यापासून थांबली असल्याने अनेक गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. तिथे रेल्वेचे काही कर्मचारी गेले दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प पुर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळी कामावरती निघालेल्या कर्मचाऱ्यांना त्यामुळे विलंब होत आहे. तसेच लोकल वेळेवर येत नसल्याने स्टेशनवरती गर्दी वाढायला सुरूवात झाली आहे.

सात वाजता मालगाडी सुरू झाली

वाशिंद आसनगाव दरम्यान बंद झालेल्या मालगाडी सात वाजता सुरू झाली आहे. त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी सुरळीत व्हायला सुरूवात झाली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या गाड्या उशीराने धावत आहे.

कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक काहीवेळाने पुर्वपदावर येईल. गाडी अचानक बंद झाल्याने कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती.