Corona cases mumbai : मुंबईत कोरोनाचा आलेख चढताच, आज 3 हजार 671 नवे रुग्ण

आज मुंबईत तब्बल 3671 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना आकडेवारीही वाढत चालली आहे.

Corona cases mumbai : मुंबईत कोरोनाचा आलेख चढताच, आज 3 हजार 671 नवे रुग्ण
CORONA AND BMC
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 7:03 PM

मुंबई : मुंबईत कोरोनाचा अलेख वाढत चालला आहे, काल मुंबईत 2510 नवे रुग्ण आढळून आल्यानंतर आज मुंबईत तब्बल 3671 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना आकडेवारीही वाढत चालली आहे. राज्याच्या एकूण आकडेवारीच्या निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबईत आढळून येत असल्याने मुंबई महापालिकेचे टेन्शन वाढले आहे. सध्या मुंबईत 11 हजार 360 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत, अशातच मुंबईला दिलासा देणारी एक बाब म्हणजे मुंबईत आज कोरोनामुळे एकाही मृत्युची नोंद झाली नाही.

मुंबईतील रुग्णांच सविस्तर आकडेवारी

मुंबईत नवी नियमावली लागू

मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याच्या पार्श्वभूमीवर (COVID-19) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कलम 144 लागू करण्याची घोषणा गुरुवारी केली. आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत (7 जानेवारी) मुंबईत जमावबंदी (Section 144) लागू असेल. त्यानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही.

पार्टी-सेलिब्रेशनला बंदी

वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप लावण्यात आला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही. लोकांनी घरातच नवीन वर्षाचे स्वागत करावे, बाहेर पडू नये असे आवाहन महापालिकेकडून वारंवार करण्यात येत आहे.

काय आहेत आदेश?

“30 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून 7 जानेवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील” असं आदेशात म्हटलं आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर कायदेशीर तरतुदींखालील कारवाई केली जाईल, असंही यात म्हटलं आहे.

Shilpa Shettyची सर्वांसमोर केली थट्टा; मग शिल्पानंही दिलं जशास तसं उत्तर, पाहा VIDEO

Ichalkaranji : शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शिवसैनिकांचा जल्लोष, पुन्हा फटाके फोडले

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.