“आव्हाड, अंधारे यांच्या भाषणाची एसआयटी चौकशी व्हावी”; या व्यक्तीनं भाषणाचा थेट नक्षलवादाशीच संबंध जोडला…

| Updated on: Feb 06, 2023 | 11:25 PM

जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या या वक्तव्याचा पाकिस्तानातील अतिरेकी संघटनेबरोबर आणि नक्षलवादाबरोबर जोडला आहे.

आव्हाड, अंधारे यांच्या भाषणाची एसआयटी चौकशी व्हावी; या व्यक्तीनं भाषणाचा थेट नक्षलवादाशीच संबंध जोडला...
Follow us on

मुंबईः “आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा” या अराजकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून महापुरुषांचा इतिहास आणि वास्तव माहिती सांगण्यासाठी सुरु झालेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका वाक्यामुळे विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढविला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची आणि शौर्याची तुलना करताना इतिहासातील संदर्भ देत इतिहास मांडला गेल्याने विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगतान औरंगजेब, अफजलखान आणि शाहिस्तखान या कट्टर विरोधकांबरोबर लढताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोण कोणते डावपेच आखले, कोणत्या गनिमी काव्याने त्यांना जेरेले आणले.

या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन आणि पुतळ्याचे दहन करण्यात आले.

त्यामुळे आता या वादात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेत जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारे ही दोन माणसं जाणीवपूर्वक आणि हेतूपुर्वक बोलत असतात अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे. त्यांनी ही टीका करत असताना त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारे यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्टाचा या कार्यक्रमांतर्गत जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास त्यांनी सांगितला. त्यामुळे त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वक्तव्यावरून भाजपसह राष्ट्रवादीच्या विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यामुळेच गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर टीका करताना त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक हे बोलले आहेत. त्यामुळे त्यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही सदावर्ते यांनी यावेळी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या या वक्तव्याचा पाकिस्तानातील अतिरेकी संघटनेबरोबर आणि नक्षलवादाबरोबर जोडला आहे.

तर जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याचा संदर्भ त्यांनी अतिरेकी संघटनेबरोबरही केले आहे. त्यामुळे आगामी काळात जितेंद्र आव्हाड यांना हे प्रकरण जड जाणार असल्याचे दिसून येत आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, या सगळ्याला शरद पवार यांची साथ आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड  आणि सुषमा अंधारे यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.