“डंके की चोट पर स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे!”, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी

गुणरत्न सदावर्ते यांचा उदयनराजेंवर पुन्हा हल्लाबोल...

डंके की चोट पर स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे!, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
| Updated on: Dec 14, 2022 | 3:33 PM

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) त्यांच्या विविध वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आताही गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केली आहे.डंके की चोट पर स्वतंत्र मराठवाडा (Marathwada) झालाच पाहिजे, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे. तसंच खासदार उदयनराजे भोसले आणि संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.

उदयनराजेंवर टीका

“उदयनराजेंची जमीन किती? मालमत्ता किती? कर भरतात? योग्य वेळी बाहेर काढणार. उदयनराजे भोसले कर देतात आणि त्यांच्याकडे किती जमीन आहे. याची माहिती महाराष्ट्राला मिळायला हवी, असं सदावर्ते म्हणाले आहेत.

राऊतांना सवाल

गृहमंत्री अमित शहा यांच्या सीमा प्रश्न बैठक घेत असताना संजय राऊत पळ काढून नाशकात काय करत आहेत? छगन भुजबळ आणि संजय राऊत यांची जेलमधून बाहेर येऊन फिफ्टी-फिफ्टी झाली आहे का?, असा सवाल सदावर्तेंनी विचारलाय.

संजय राऊत स्वतंत्र विदर्भ आणि स्वतंत्र मराठवाड्याला विरोध करतात. त्यामुळे तुमच्या अकलेची लायकी उघडी पडली आहे. तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल, असं सदावर्तेंनी म्हटलंय.

सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केला होता की, राज्यपाल आणि भाजपचे नेते राष्ट्रपुरुषाविषयी वादग्रस्त बोलले असताना गुणरत्न सदावर्ते याबद्दल का बोलत नाहीत? त्यालाही सदावर्तेंनी उत्तर दिलं आहे. कोण सुषमा अंधारे असा प्रश्न सदावर्ते यांनी उपस्थित केला. सुषमा अंधारे यांची काय लायकी आहे? अंधारे असो कोणी असो मला शहाणपणा शिकवायच्या भानगडीत पडायचं नाही. काल मोर्चामध्ये भाषणे का झालं नाही. त्याच्या मागे कारण आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही, असं सदावर्ते म्हणालेत.