गुलाब चक्रीवादळाचा मुंबईकरांना असाही फटका; मुंबईत भाज्यांचे दर गगनाला भिडले

| Updated on: Sep 29, 2021 | 9:02 AM

Vegetables rates in Mumbai | गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथील शेती पाण्याखाली गेली असून दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले आहेत. त्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे.

गुलाब चक्रीवादळाचा मुंबईकरांना असाही फटका; मुंबईत भाज्यांचे दर गगनाला भिडले
भाजीपाला
Follow us on

मुंबई: सतत पडणारा पाऊस, डिझेलची भाववाढ, शेतकऱ्यांनी भाजी उत्पादनाकडे फिरवलेली पाठ अशा विविध कारणांमुळे भाजीच्या दराला महागाईची फोडणी बसली आहे. पितृपक्ष सुरू झाल्यापासून भाज्यांच्या दरांमध्ये आठ ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाज्यांनी शंभरी पार केली आहे. (Vegetable rates increased in Mumbai)

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथील शेती पाण्याखाली गेली असून दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले आहेत. त्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या भाज्या सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे किचन बजेट कोलमडताना दिसत आहे.

बाजारपेठेतील भाज्यांचे भाव खालीलप्रमाणे

वांगी 40 रुपये
मटार 150-160 रुपये
कोथिंबीर 30-35 रुपये
शिमला मिरची 50 रुपये
फरसबी 40 रुपये
भेंडी 40-80 रुपये
गवार 80 रुपये
तेंडली 70-80 रुपये
टोमॅटो 40-50 रुपये
फ्लॉवर 60-80 रुपये
मेथी 40 रुपये
शेंगा – 60 रुपये
कारली – 40 रुपये
मिरची -40 रुपये
सुरण -32 रुपये

दसरा-दिवाळीपर्यंत एलपीजी आणखी महागणार?

ऑक्टोबरपासून गॅसच्या किंमतीमध्ये 70 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ होण्याचा अंदाज आहे. घरगुती गॅसच्या नवीन किमती 1 ऑक्टोबरपासून सरकार ठरवणार आहे. अशा परिस्थितीत ऑटो इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि घरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईप केलेल्या नैसर्गिक वायूच्या (पीएनजी) किंमती वाढतील. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कॉमन मॅनला इंधन दरवाढीचा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहे. येत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सोसून इंधनाचे दर स्थिर ठेवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, लवकरच सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.

संबंधित बातम्या:

तुमच्या जुन्या एलपीजी सिलेंडरच्या बदल्यात घ्या नवीन फायबर ग्लास कम्पोझिट सिलेंडर, एवढे मोजावे लागतील पैसे

आता मिस्ड कॉल देऊन मिळवा एलपीजी कनेक्शन; जाणून घ्या संपूर्ण तपशील

खुशखबर ! एलपीजी सिलिंडर रिफिलिंगसाठी आता हवा तो वितरक निवडता येणार, सरकार करणार ‘हे’ मोठे बदल

(Vegetable rates increased in Mumbai)