खुशखबर ! एलपीजी सिलिंडर रिफिलिंगसाठी आता हवा तो वितरक निवडता येणार, सरकार करणार ‘हे’ मोठे बदल

आता आपले गॅस कनेक्शन बदलणे तसेच सोयीचा गॅस सिलिंडर डिस्ट्रिब्यूटर निवडणे आणखी सोपे झाले आहे. यापुढे ग्राहक आपल्या सोईचा कोणताही गॅस डिस्ट्रिब्यूटर निवडू शकणार आहेत.

खुशखबर ! एलपीजी सिलिंडर रिफिलिंगसाठी आता हवा तो वितरक निवडता येणार, सरकार करणार 'हे' मोठे बदल
GYS CYLINDER

मुंबई : एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या लोकांना आता आपल्या सोयीचा गॅस सिलिंडर डिस्ट्रिब्यूटर निवडता येणार आहे. त्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय मंत्रालय लवकरच आपली नवी सुविधा सुरु करणार आहे. या सुविधेचे नाव डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटी असे आहे. या सुविधेनुसार ग्राहक आपल्या सोईनुसार एपीजी सिलिंडर वितरक निवडू शकतील. (LPG cylinder customers will be free can choose any distributor through digital LPG portability program)

आपल्या सोईनुसार गॅस वितरक निवडता येणार

पहिल्या टप्प्यात ही सुविधा चंदिगड, कोयंबतूर, गुरगाव, पुणे आणि रांची या शहरात सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर या योजनेचा विस्तार इतर ठिकाणी केला जाईल. या सुविधेमध्ये डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटीद्वारे ग्राहक आपल्या मोबाईल अॅप किंवा पोर्टलच्या माध्यमातून लॉगीन करुन आपल्या सुविधेनुसार डिस्ट्रिब्यूटर निवडू शकतील. त्यासाठी सर्व डिस्ट्रिब्यूटर्सच्या रेटिंग्स आपल्यासमोर असतील.

वितरकांमध्ये स्पर्धा वाढणार

एलपीजी सिलिंडर रिफिल केल्यांतर त्याची घरपोच डिलिव्हरी होण्यासाठी यानंतर ग्राहक आपल्या सोईनुसार वितरक निवडू शकतील. त्यामुळे ग्राहकांना कमी वेळेत लवकर सिलिंडर मिळण्यास मदत होईल. तसेच दुसऱ्या बाजूने जास्तीत जास्त ग्राहक मिळावेत म्हणून वितरकसुद्धा सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तसेच चांगले रेटिंग मिळावेत म्हणून प्रयत्न करतील. याच कारणामुळे आगामी काळात वितरकांमध्ये स्पर्धा सुरु होणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने पैसे देता येणार

एलपीजी ग्राहक उमंग अॅपच्या माध्यमातून आपल्या गॅस रिफिलिंगसाठी बुकिंग करु शकतात. तसेच भारत बील पे सिस्टिमच्या माध्यमातूनसुद्धा गॅस रिफिलिंगसाठी बुकिंग करता येणार आहे. अॅमेझॉन तसेच पेटीएमच्या माध्यमातूनसुद्धा पैस देण्याचा पर्याय सध्या उपलब्ध आहे.

सिलिंडरचे सध्याचे दर काय आहेत

दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला 19 किलोचे व्यावसायिक LPG सिलिंडर स्वस्त झाले होते. या सिलिंटरच्या किमतीमध्ये 122 रुपयांनी कपात करण्यात आली होती. तर घरगुती सिलिंडरची किंमत मुंबई आणि दिल्लीमध्ये 809 रुपए प्रति सिलिंडर आहे.

इतर बातम्या :

10 वर्षाच्या मुलांच्या नावावर दररोज 15 रुपये जमा करुन 28 लाख मिळवण्याची संधी, वाचा सविस्तर

कर्जाची परतफेड करण्याआधीच कर्जदाराचं निधन झालं तर त्या लोनचं नेमकं काय होतं? जाणून घ्या सविस्तर

PAN-AADHAR LINK : पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्यास मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत लिंक करता येणार

(LPG cylinder customers will be free can choose any distributor through digital LPG portability program)