हिंदुस्थानी भाऊला मोठा दिलासा; मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

अखेर हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने विकास पाठक याला जामीन मंजूर केला. धारावीमधील विद्यार्थी आंदोलनाप्रकरणात विकास पाठक याला एक फेब्रुवारी रोजी धारावी पोलिसांनी अटक केली होती.

हिंदुस्थानी भाऊला मोठा दिलासा; मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
हिंदुस्तानी भाऊला जामीन
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 4:52 PM

मुंबई : अखेर हिंदुस्थानी भाऊ (Hindusthani Bhau) ऊर्फ विकास पाठक (Vikas Pathak) याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने विकास पाठक (Mumbai Sessions Court) याला जामीन मंजूर केला. धारावीमधील विद्यार्थी आंदोलनाप्रकरणात विकास पाठक याला एक फ्रेब्रुवारी रोजी धारावी पोलिसांनी अटक केली होती. अटक करून हिंदुस्थानी भाऊला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावणी, त्यानंतर त्याच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसांची वाढ करण्यात आली. पोलीस कोठडी संपल्यानंतर हिंदुस्थानी भाऊ हा न्यायालयीन कोठडीत होता. अखेर त्याला 30 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. याबाबत हिंदुस्थानी भाऊचे वकील अनिकेत निकम यांनी माहिती दिली आहे. हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याला जामीन मंजूर झाल्याने अखेर आता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय म्हणाले वकील ?

हिंदुस्थानी भाऊचे वकील अनिकेत निकम यावेळी बोलताना म्हणाले की, हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याला एक फेब्रुवारी रोजी विद्यार्थी आंदोलन प्रकरणात अटक करण्यात आली होती. अखेर आज झालेल्या सुनावणीदरम्यान हिंदुस्थानी भाऊला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हिंदूस्थानी भाऊला 30 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

विद्यार्थी आंदोलन प्रकरणात हिंदुस्तानी भाऊला धारावी पोलिसांनी अटक केली होती. दहावी, बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन न घेता, ऑनलाईनच घेण्यात याव्यात अशी मागणी हिंदुस्थानी भाऊने केली होती. या प्रकरणात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर जमत हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनस्थळी हिंदुस्थानी भाऊने देखील भेट दिली होती. मात्र पोलिसांनी त्याला तिथे थांबू दिले नव्हते. या आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याचाच हात असल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. अखेर या आंदोलन प्रकरणात त्याला एक फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. तब्बल सोळा दिवसानंतर त्याला जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्याने हिंदुस्थानी भाऊला मोठा दिलासा मिळालाय.

संबंधित बातम्या

Mumbai Crime : टकटक गँगच्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

नवी मुंबईला मुंबईशी अर्ध्या तासात जोडणारी वॉटर टॅक्सी परवडणारी आहे का? जाणून घ्या तिकीट दर

देशमुखांच्या विधानावरून नव्हे तर एनआयएच्या आरोपपत्राच्या आधारावर आरोप; मलिकांचा चांदीवाल आयोगासमोर खुलासा

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.