Hindustani Bhau : टपाटप? टपाटप? 3 दिवसांची पोलीस कोठडी, हिंदुस्तानी भाऊसोबत पोलीस काय करणार?

| Updated on: Feb 01, 2022 | 4:34 PM

विद्यार्थी आंदोलनात पुढे आलेला हिंदुस्तानी भाऊ आता आणखी अडचणीत आला आहे. कारण हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी अटक करत कोर्टात हजर केलं आणि त्यांनंतर कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Hindustani Bhau : टपाटप? टपाटप? 3 दिवसांची पोलीस कोठडी, हिंदुस्तानी भाऊसोबत पोलीस काय करणार?
हिंदुस्तानी भाऊला जामीन
Follow us on

मुंबई : परीक्षा ऑनलाईन (Online Exam) घ्याव्या या मागणीसाठी काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात हिंदुस्तानी भाऊचं (Hindustani Bhau) नाव पुढे आलं. हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास भडकावल्याचा आरोप करण्यात आला. कालच्या विद्यार्थी आंदोलनात पुढे आलेला हिंदुस्तानी भाऊ आता आणखी अडचणीत आला आहे. कारण हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी अटक करत कोर्टात हजर केलं आणि त्यांनंतर कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊबरोबर पोलीस काय करणार? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. विद्यार्थी आंदोलनापूर्वीचे हिंदुस्तानी भाऊचे काही व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाऊच्या अडचणी वाढल्या आहेत. कालचं आंदोलन एवढं आक्रमक होतं की विद्यार्थ्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

या आंदोलनानंतर प्रशासन खडबडून कामाला लागलं. पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं हालवली आणि बघता बघता पोलीस हिंदुस्तानी भाऊपर्यंत पोहोचले. आंदोलन भडकवणारी आणखीही काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. युट्युबर विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारावी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ हा या प्रकरणात मुख्य आरोपी असून त्याला आणि इतर काही लोकांना आरोपी बनवण्यात आलं आहे. सोशल मीडियाद्वारे चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात आली होती, त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच पोलिसांनी सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर करण्याचं आवाहन लोकांना केलं आहे.

या प्रकरणात आणखी काही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी राज्य सरकारकडे मांडायला हवी होती, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मांडले. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती असावी अशी शंका व्यक्त करत जाणीवपूर्वक असे घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन गृहमंत्र्यांनी केले. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे.

काही लग्नांच्या गाठी स्वर्गात नाही, नरकात बांधल्या जातात, दाम्पत्यातील वादावर हायकोर्टही संतापलं

Student Protest : विद्यार्थी आंदोलनामागे षडयंत्र, वळसे-पाटलांचा आरोप, तर आणखी एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती

Nashik | आली समिप घटिका; नाशिक, मुंबई महापालिकेची प्रभाग रचना आज होणार जाहीर, कोणाचा पत्ता कटणार?