नव्या संचारबंदीवर हॉटेल व्यावसायिक नाराज, शरद पवारांनाही भेटणार

| Updated on: Dec 22, 2020 | 10:51 AM

हॉटेल व्यावसायिक रात्रीच्य संचारबंदीबाबात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत.Hotel Owners will meet Sharad Pawar

नव्या संचारबंदीवर हॉटेल व्यावसायिक नाराज, शरद पवारांनाही भेटणार
Follow us on

मुंबई: यूकेमधील कोरोना विषाणूच्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केलीय. राज्य सरकारच्या या निर्णयावर हॉटेल व्यावयसायिकांनी नाराजी व्यक्त केलीय. आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. हॉटेल सुरु ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. (Hotel Owners will meet Sharad Pawar on night curfew issue )

रात्रीच्या संचारबंदीवर हॉटेल व्यावसायिक नाराज

राज्य सरकारने 5 जानेवारीपर्यंत रात्रीच्या संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केलीय. हॉटेल सुरु ठेवण्यासाठी 11 ची वेळ दीड वाजेपर्यंत वाढवून द्यावी,अशी मागणी करण्यात आलीय.

आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर हा व्यवसायाचा काळ असतो. या काळातच हॉटेल सुरु ठेवण्यास कमी वेळ मिळाला तर मोठे नुकसान होईल, असं शेट्टी यांनी सांगितले. लॉकडाऊन नंतर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्या नियमावलीचे पालन करत हॉटेल व्यावसाय सुरू केले. पण, आताच्या महापालिकेच्या आणि राज्य सरकारच्या निर्णयाने हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प होईल. यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती शिवानंद शेट्टी यांनी व्यक्त केली.

शिवानंद शेट्टी यांनी राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे म्हटले. हॉटेल व्यवसाय बंद झाले तर सरकारचाही महसूल बुडणार आहे. हॉटेल व्यावसायिकांसाठी नियम शिथिल केले पाहिजे, ही मागणी हॉटेल व्यावसायिक करणार आहेत.(Hotel Owners will meet Sharad Pawar on night curfew issue )

शरद पवार यांची वेळ मागितली होती पण ते पुण्यात आहेत. त्यामुळे लवकर त्यांची भेट घेऊन यासंदर्भात तोडगा काढावा म्हणून त्यांना सांगणार आहोत, असं आहार संघटनेच्या शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांचाही विरोध

आहार संघटनेनंतर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर असोसिएशनने मुंबईतील कर्फ्यूला विरोध केला आहे. कोरोनासोबत व्यापाऱ्यांच्या हिताचाही सरकारने विचार करावा, अशी मागणी विरेन शाह यांनी केली आहे. लॉकडाऊनमध्ये हॉटेल, बार, दुकानदारांचं कंबरडं मोडलं, त्यामुळे सरकारने नाईट कर्फ्यूबाबत पुन्हा विचार करावा, असं आवाहन विरेश शाहांनी केले आहे. हेल्थ परवाने, दुकानाचे परवाने, प्रॉपर्टी टॅक्स, पाणी बील यामध्ये मनपानेही सुट द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. जर व्यवसाय बंद झाला तर टॅक्स कसा भरणार असा सवाल एफआरटीडब्ल्यूओचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केला.

मध्यपूर्वेतून येणारे प्रवासी 14 क्वारंटाईन

संपूर्ण यूरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन अनिवार्य करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल.

ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर यूरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

संबंधित बातम्या:

नाईट कर्फ्युमुळे हॉटेल व्यावसायिक नाराज? शरद पवारांच्या भेटीला जाण्याची शक्यता

Maharashtra Night Curfew: महाराष्ट्रात आजपासून नाईट कर्फ्यू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

(Hotel Owners will meet Sharad Pawar on night curfew issue )