
मुंबईमध्ये आता फिरताना किल्ल्यासारखं किंवा पडक्या राजवाड्यासारखं काहीतरी दिसतं. नव्या पिढीला आता एखाद्या गोष्टीसारखं सांगावं लागतं की ही कापड गिरण होती. भव्यदिव्य दिसत असलेलं हे नेमकं काय? असा प्रश्न त्यांना पडत असावा. पण हेच जर 70 आणि 80च्या दशकातील गिरणी कामगार मुंबईत आल्यावर टोलेगंज इमारती पाहून आपसूकच मनातल्या मनात विचार करेल. गड्या इथं तर मोरारजी, मफतलाल, सेंच्युरी मिल होती ना? मात्र आता सर्व काही बदलून गेलंय. मुंबापुरीचं सर्व रूपडंच आता पालटलंय. बुलेट ट्रेन, मोनो रेलचे ब्रिज तर मोठ्या-मोठ्या इमारती. हे सर्व पाहिल्यावर गिरणी कामगाराला त्याचे त्यावेळचे दिवस आठवल्याशिवाय राहणार नाहीत. पण तुम्हाला माहिती का आता मुंबईमध्ये ज्या ठिकाणी गिरणी होत्या त्या ठिकाणी आता काय आहे? जाणून घ्या. ...