IDFC बँकेच्या अधिकाऱ्याकडून मुंबईत 52 कोटीच्या फ्लॅटची खरेदी

| Updated on: Sep 28, 2019 | 9:10 AM

मुंबईसारख्या शहरात हक्काच घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचे असते. यासाठी प्रत्येकजण जीवाचे रान करुन मुंबईत घर घेण्यासाठी झटत असतो.

IDFC बँकेच्या अधिकाऱ्याकडून मुंबईत 52 कोटीच्या फ्लॅटची खरेदी
Follow us on

मुंबई : मुंबईसारख्या शहरात हक्काच घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचे असते. यासाठी प्रत्येकजण जीवाचे रान करुन मुंबईत घर घेण्यासाठी झटत असतो. मुंबईतील घरांची किंमतही अधिक आहे. मुंबईत मोठ्या मोठ्या इमारती आहेत. या इमारतीमधील फ्लॅटच्या किंमतीही कोटींच्या घरात आहेत. याच दरम्यान मुंबईत आतापर्यंत सर्वात महागड्या फ्लॅटची (Mumbai Costly Flat) विक्री झाली आहे. या फ्लॅटची किंमत तब्बल 52 कोटी रुपये आहे.

मुंबईतील प्रभादेवी स्थित BeauMonde Towers या गगनचुंबी इमारतीमध्ये हा 52 कोटींची फ्लॅट (Mumbai Costly Flat) आहे. या टॉवरमधील 25 व्या मजल्यावर हा फ्लॅट खेरदी करण्यात आला आहे. वेंबू स्वामिनाथन या व्यक्तिने हा फ्लॅट खरेदी केला आहे. स्वामिनाथन हे आयडीएफसी फर्स्ट बँकेचे वरीष्ठ अधिकारी आहेत.

25 व्या मजल्यावरील 2501 आणि 2502 असे दोन फ्लॅट स्वामिनाथन यांनी खरेदी केले आहेत. या दोन्ही फ्लॅटसाठी त्यांनी 52 कोटी रुपये मोजले आहेत. 1 कोटी 46 लाख प्रति स्क्वेअर फुटच्यादराने हा फ्लॅट खरेदी करण्यात आला आहे.

या पूर्वी लोढा अल्टामाऊंटमध्ये 38 कोटींचा फ्लॅट खरेदी करण्यात आला होता. हा फ्लॅट समुद्र किनारी असल्यामुळे या फ्लॅटला मोठ्या प्रमाणात मागणी होती. दक्षिण मुंबईच्या ‘अल्टामाउंट रोड’वरील ‘लोढा अल्टामाउंट’ या टॉवरच्या ‘ए विंग’ इमारतीत 2 हजार 952 स्क्वेअर फुटांच्या एका फ्लॅटची नुकतीच विक्री झाली.