Corona Update : गरिबांची लूट थांबवणे, उपचारपद्धती नव्याने ठरवण्याची गरज, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत टोपेंचे मुद्दे

| Updated on: Apr 02, 2021 | 6:59 PM

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची बैठक पार पडली. या बैठकीत राजेश टोपे यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.

Corona Update : गरिबांची लूट थांबवणे, उपचारपद्धती नव्याने ठरवण्याची गरज, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत टोपेंचे मुद्दे
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us on

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे. अशावेळी राज्य सरकारकडून आज महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता कमीच आहे. पण कठोर निर्बंध लावले जाऊ शकतात असा अंदाज राजकीय स्तरातून व्यक्त केला जातोय. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची बैठक पार पडली. या बैठकीत राजेश टोपे यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. (Important meeting between CM Uddhav Thackeray and Rajesh Tope on the background of Corona)

रुग्णांवरील उपचार पद्धतीत बदल होणार?

राज्यात गेल्या वर्षभरात कोरोना रुग्णांवर एका ठाराविक पद्धतीने उपचार सुरु आहे. मात्र आता कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. त्याचबरोबर रुग्णांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेनही आढळून येत आहे. अशावेळी रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराची पद्धत नव्याने ठरवण्याची गरज असल्याचा मुद्दा आरोग्यमंत्री टोपे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांवरील उपचाराची पद्धत काहीशी बदलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना चाचणीसाठी होणारी गरीबांची लूट थांबवा

राज्य सरकार सध्या ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर देत आहे. अशावेळी कोरोनाची कुठलिही लक्षणं आढळल्यास कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातं. तसंच कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांनीही कोरोना चाचणी करुन घेण्याच्या सूचना केल्या जातात. पण राज्यात अनेक ठिकाणी कोरोना चाचणीसाठी गरीबांची मोठ्या प्रमाणात लूट सुरु आहे. गरीबांची होणारी ही लूट थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची विनंतीही राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यात तूर्तास लॉकडाऊन लागणार नाही- टोपे

नागरिकांनी गर्दी टाळली आणि घालून दिलेल्या नियमांचं पालन केलं तर कोरोना रुग्णांची संख्या आपोआप कमी होईल. तेव्हा लॉकडाऊनची गरज तूर्तास तरी लागणार नाही. पण लोक स्वयंशिस्त पाळत नाहीत. त्यामुळे निर्बंध कडक करावे लागत आहेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असतो. जेव्हा सरकारच्या हातातील सर्व आयुधं संपतील. बेड्स उपलब्ध नसतील, अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन शिवाय पर्याय उरत नाही. पण सध्या नागरिकांनी शिस्त पाळावी, गर्दी करु नये, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलंय.

‘राज्य स्तरावर निर्बंध ठरणे गंरजेचं’

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी बंद ठेवायचे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाने चालत होते. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर अहवाल आणून निर्णय घेण्याचं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. पुण्यात जो निर्णय झाला तो वरिष्ठ स्तरावर चर्चा करुन निर्णय घेतला. पुण्यात निर्बंध लावणं गरजेचं होतं. पण तसे सर्वदूर लावले असं नाही. कोणत्या जिल्ह्यात निर्बंध लावले पाहिजेत, तेही महत्त्वाचं आहे. देशातील टॉप आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत, असंही आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद, उद्धव ठाकरे 5 मोठ्या घोषणा करण्याची शक्यता

Pune lockdown update : मोठी बातमी : पुण्यात अंशत: लॉकडाऊन, 7 दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद

Important meeting between CM Uddhav Thackeray and Rajesh Tope on the background of Corona