AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune lockdown update : मोठी बातमी : पुण्यात अंशत: लॉकडाऊन, 7 दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद

Pune Corona lockdown update : पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील.

Pune lockdown update : मोठी बातमी :  पुण्यात अंशत: लॉकडाऊन, 7 दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद
Sourabh Rao
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Apr 02, 2021 | 2:17 PM
Share

पुणे : पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट (Pune Corona lockdown update) होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. (Pune Corona lockdown update all mall, Religious places, hotel, PMPML bus service closed for seven days). पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

याबाबत सौरभ राव म्हणाले, “परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील”.

बेडची संख्या वाढवणार,टेस्टिंग वाढवलं जाईल. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणार. मागील दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या 3 ते 4 दिवसात 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.

पुणे विभागात कोल्हापूर वगळता सांगली, सातारा, सोलापूरमध्ये रुग्णसंख्या वाढ चिंतेचा विषय आहे. सुपरस्प्रेडरची आठवड्यातून एकदा टेस्ट बंधनकारक आहे.

पुण्यात काय सुरु काय बंद?

  • सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील.
  • मॉल आणि सिनेमा हॉल ७ दिवसांसाठी बंद
  • धार्मिक स्थळं बंद ७ दिवसांसाठी बंद
  • PMPML बससेवा 7 दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु
  • आठवडे बाजारही बंद
  • लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत
  • संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
  • दिवसभर जमावबंदी
  • जिम सुरु राहणार
  • दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार
  • शाळा महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद

पुण्यातील सध्यस्थिती

– पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम – पुढील आठवड्यापर्यंत भयावह परिस्थिती – पुन्हा एकदा पुण्यात बेडची कमतरता जाणवणार – जिल्ह्यात मृत्युदरही वाढण्याची शक्यता 2 एप्रिल 2022

पुणे जिल्ह्याची बेड स्थिती

एकूण बेड्सची स्थिती

– ऑक्सिजन बेड्स – 9118 – ऑक्सिजन विरहीत बेड्स – 41093 – आयसीयु बेड्स – 2927 – व्हेंटिलेटर्स बेड – 996

उपचार बेडची स्थिती

ऑक्सिजन बेडवर उपचार संख्या – 2974 ऑक्सिजन विरहीत बेडवर उपचार संख्या – 11563 आयसीयु बेडवर उपचार संख्या – 1073 व्हेंटिलेटर्स बेडवर उपचार संख्या – 376

शिल्लक बेडची स्थिती

– ऑक्सिजन बेड्स – 6144 – ऑक्सिजन विरहीत बेड्स – 29530 – आयसीयु बेड्स – 1854 – व्हेंटिलेटर्स बेड – 620

रुग्ण संख्येची स्थिती

– ऍक्टिव्ह रुग्ण – 61740 – रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या – 15986 ( यामधील गंभीर रुग्ण 4423 ) – घरी उपचार घेणारे रुग्ण – 45754

12 एप्रिल पर्यंतचा प्रशासकीय अनुमान

– ऑक्सिजन विरहित फक्त 9 बेड्स शिल्लक राहतील – 3207 ऑक्सिजन बेडची कमतरता भासेल – 462 आयसीयु बेड शिल्लक राहतील – 647 व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल

जिल्ह्याचा मृत्यूदर

– पुणे मनपा – 2 टक्के – पिंपरी चिंचवड – 1.4 टक्के – पुणे देहू व खडकी कॉनटोन्मेंट बोर्ड – 2.3 टक्के – पुणे ग्रामीण – 1.9 टक्के – पुणे जिल्ह्याचा एकूण मृत्यू दर – 1.8

VIDEO : विभागीय आयुक्त सौरभ राव यांची पत्रकार परिषद

संबंधित बातम्या 

राज्यात अंशत: लॉकडाऊन शक्य, ठाकरे सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांचा इशारा, नियमही सांगितले!   

बचेंगे तो और भी लढेंगे, मुंबईच्या महापौरांनी मूठ आवळली, लॉकडाऊन की निर्बंध लवकरच घोषणा

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?