राज्यात अंशत: लॉकडाऊन शक्य, ठाकरे सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांचा इशारा, नियमही सांगितले!

राज्यात अंशत: लॉकडाऊन (Maharashtra partial lockdown) होण्याचा इशारा ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याने दिला आहे.

राज्यात अंशत: लॉकडाऊन शक्य, ठाकरे सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांचा इशारा, नियमही सांगितले!
Maharashtra Lockdown

मुंबई : राज्यात अंशत: लॉकडाऊन (Maharashtra partial lockdown) होण्याचा इशारा ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याने दिला आहे. खुद्द मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी तशी शक्यता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या (Corona) उद्रेकामुळे मॉल, सिनेमागृह, नाट्यगृहे बंद ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याआधी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी लॉकडाऊन नसेल पण कडक निर्बंध असतील असं सांगितलं होतं. (Maharashtra partial lockdown warns Minister Aslam Shaikh what will CM Uddhav Thackeray announce about Mumbai local train)

मुंबईसह ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणची हॉटेल्स बंद ठेवली जातील. मात्र हॉटेल्सना होम डिलिव्हरी किंवा ‘टेक अवे’अर्थात पार्सलची परवानगी असेल. शॉपिंग मॉल्स 15 दिवसांसाठी बंद ठेवले जाऊ शकतात. खासगी आस्थापनांना ‘वर्क फॉर्म होम’ची सक्ती केली जाईल. इतकंच नाही तर रेल्वेसेवा आपत्कालीन कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवली जाईल, असं अस्लम शेख म्हणाले.

अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरु काय बंद असू शकतं?

  • शॉपिंग मॉल पूर्ण बंद
  • हॉटेल्स बंद, पण पार्सल आणि होम डिलिव्हरी सुरु राहणार
  • खासगी आस्थापनांना ‘वर्क फॉर्म होम’ची सक्ती
  • रेल्वेसेवा आपत्कालीन कर्मचाऱ्यांसाठीच ठेवण्याची शक्यता

मुंबईच्या महापौरांनी मूठ आवळली

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मूठ आवळली आहे. बचेंगे तो और भी लढेंगे, माणसं जगली तर पुढचं काही करता येईल. त्यामुळे निर्बंध कडक केले जातील. लोकांनी नियम पाळले पाहिजे, अनेकजण मास्क वापरत नाहीत. लॉकडाऊन कुणालाच नको आहे. मात्र नियम पाळले नाहीत तर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबई लोकलबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनाचे दररोज 35 ते 40 हजार रुग्ण वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. गर्दी कशी कमी होईल, यावर भर दिला जाईल. लॉकडाऊन जरी नसला तरी निर्बंध अधिक कडक केले जातील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. मुंबई लोकल बंद होणार नाही, पण प्रवाशांची विभागणी करण्यात येईल. लोकल बंद होणार नाही पण निर्बंध लागतील, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

VIDEO : विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

संबंधित बातम्या 

Maharashtra second lockdown : वडेट्टीवार यांची मुंबई लोकलबाबत मोठी घोषणा, प्रवाशांची विभागणी होणार

(Maharashtra partial lockdown warns Minister Aslam Shaikh what will CM Uddhav Thackeray announce?)

Published On - 1:14 pm, Fri, 2 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI