Mumbai | मुंबईत पाच वर्षांमध्ये 16 लाख उंदरांचा खात्मा, 1 उंदीर मारण्यासाठी महापालिकेला 22 रूपयांचा खर्च!

| Updated on: Jun 15, 2022 | 9:25 AM

मुंबईमध्ये 2018 पासून ते मे 2022 पर्यंत 16 लाख 45 हजार 19 उंदरांचा खात्मा मुंबई महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून करण्यात आलायं. यासाठी काही खासगी संस्थांची देखील मदत घेण्यात आलीये. यंदा 1 लाख 69 हजार 596 उंदरांचा खात्मा करण्यात आलायं. मुंबई महापालिकेसोबत काही खासदी संस्थांच्या माध्यमातून ही मोहिम संपूर्ण शहरामध्ये सुरू आहे.

Mumbai | मुंबईत पाच वर्षांमध्ये 16 लाख उंदरांचा खात्मा, 1 उंदीर मारण्यासाठी महापालिकेला 22 रूपयांचा खर्च!
Image Credit source: Britannica.Com
Follow us on

मुंबई : राज्यात पावसाचे आगमन झाल्यामुळे मुंबईत (Mumbai) साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. साथीचे रोग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपायोजना आखल्या जातात. राज्यामध्ये अगोदरच कोरोनाच्या रूग्णांची येणारी आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यामुळे आता साथीच्या रोगाच्या रूग्णांची (Patient) संख्या देखील वाढताना दिसते आहे. महापालिका लेप्टो या संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करते आहे. त्याच पार्श्वभूमीवर लेप्टो पसरवण्यास कारणीभूत असलेल्या उंदरांना (Rat) मारण्यासाठी विशेष मोहिम राबवली जातंय. पाच वर्षांमध्ये 16 लाख तर यंदा दीड लाख उंदरांचा खात्मा करण्यात आला आहे.

16 लाख 45 हजार 19 उंदरांचा खात्मा

मुंबईमध्ये 2018 पासून ते मे 2022 पर्यंत 16 लाख 45 हजार 19 उंदरांचा खात्मा मुंबई महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून करण्यात आलायं. यासाठी काही खासगी संस्थांची देखील मदत घेण्यात आलीये. यंदा 1 लाख 69 हजार 596 उंदरांचा खात्मा करण्यात आलायं. मुंबई महापालिकेसोबत काही खासगी संस्थांच्या माध्यमातून ही मोहिम संपूर्ण शहरामध्ये सुरू आहे. खासगी संस्थेला एक उंदीर मारण्याचे 22 रूपये महापालिकेला मोजावे लागतात. मलेरिया, गॅस्ट्रो, स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू आणि लेप्टो हे रोग रोखण्यासाठी विशेष उपायोजना केल्या जात आहेत. उंदीर, कुत्रे, म्हशी, गाई यांचे मलमूत्र पाण्याच्या संपर्कात आल्यावर व्यक्तीला लेप्टोचा संसर्ग लगेचच होतो.

हे सुद्धा वाचा

लेप्टोचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन

लेप्टोचा संसर्ग पसरवण्याचे काम उंदीर मोठ्या प्रमाणात करतात. उंदरांना अॅल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्या टाकून मारले जाते. उंदीर मारण्याची ही मोहीम पावसाळ्याच्या हंगामात बंद असते. मात्र, जर दोन ते तीन दिवसांच्या गॅप पडला तर मग ही मोहीम परत एकदा सुरू केली जाते. तसेच महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शक्यतो घरामध्ये उंदर होऊ देऊ नका. तसेच उघड्यावर अन्न टाकू नका. कारण ते अन्न खाण्यासाठी उंदीर येतात आणि तिथेच बिळ तयार करतात. घरामध्ये स्वच्छता ठेवा आणि घरामध्ये जर उंदीर झाले असतील तर ओळ्या ठेवून त्यांचा खात्मा करा.