बैलगाडा शर्यतीच्यावेळीच अंदाधूंद गोळीबार, दोन्ही गटातील वाद टोकाला…

| Updated on: Nov 13, 2022 | 4:59 PM

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वेळी पाटील आणि फडके गटाचा वाद झाल्याने फडके गटाने पाटील गटावर अंधाधूंद गोळीबार करण्यात आला होता.

बैलगाडा शर्यतीच्यावेळीच अंदाधूंद गोळीबार, दोन्ही गटातील वाद टोकाला...
file Photo
Follow us on

मुंबईः अंबरनाथमध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात ताणतणावाचे वातावरण पसरले आहे. ही घटना घडताच शिवाजीनगर पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

पनवेलमधील पंढरीशेठ फडके आणि कल्याणचे राहुल पाटील यांच्यातील वादामुळे अंबरनाथमध्ये आज अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. हवेत लागोपाठ अंदाधूंद गोळीबार करण्यात आल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडके गट आणि राहुल पाटील गटाचे शाब्दिक वाद झाले त्यानंतर मात्र फडके गटाने रागाने पाटील गटावर अंदाधुंद गोळीबार केला.

नागरिक जमा झालेले असतानाच अंदाधूंद गोळीबार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असतानाच हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली, ही घटना अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ घडली आहे. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

यावेळी फडके गटाने पाटील गटावर अंदाधुंद गोळीबार केल्याने काही वेळ येथील परिसरात ताणतणाव पसरला होता. त्यानंतर मात्र पोलिसांनी येऊन हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

ही घटना घडताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ही परिस्थिती हातळण्याचा प्रयत्न केला. फडके गटाने पंधरा ते वीस वेळा गोळ्या झाडण्यात आल्याने पोलीस कसून चोकशी करीत होते.