Kdmc : परदेशातून रुग्ण उपचारासाठी आल्यास kdmc ला कळवण्याचं आवाहन, अफ्रिकेतून आलेला प्रवासी कोरोनाबाधित

| Updated on: Nov 29, 2021 | 7:52 PM

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन या शहरातून डोंबिवलीत आलेल्या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याच्या जिनोम सिक्वेन्सींगचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. त्यांच्या कुटुंबातील सात जणांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

Kdmc : परदेशातून रुग्ण उपचारासाठी आल्यास kdmc ला कळवण्याचं आवाहन, अफ्रिकेतून आलेला प्रवासी कोरोनाबाधित
केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Follow us on

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आल्याने केडीएमसी प्रशासन सतर्क झाले आहे . कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जनरल प्रॅक्टीशनर आणि खाजगी रुग्णालयांच्या डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून काही देशातून आलेले प्रवासी उपचारासाठी आल्यास त्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागास द्यावी असे आवाहन केले आहे.

अफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या रुग्णाला कोरोना

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन या शहरातून डोंबिवलीत आलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याच्या जिनोम सिक्वेन्सींगचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. त्यांच्या कुटुंबातील सात जणांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तसेच तो राहत असलेल्या इमारतीमधील नागरीकांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णामुळे मुंबई, राज्याची चिंता वाढली

अफ्रिकेतून आलेल्या या प्रवाशानं राज्य आणि विशेषत मुंबईच्या चिंतेत मोठी भर घातली आहे. जगभरात अनेक देशांत नव्या व्हेरिएंटने एन्ट्री केली आहे. मात्र अजून भारतात एन्ट्री झाली नव्हती, आता या प्रवाशाच्या अंतिम अहवालावर बऱ्याच गोष्ट्री अवलंबून असणार आहेत. पालिका प्रशासन मात्र जोमाने कामाला लागलं आहे.

विमानातील सहप्रवाशांचीही कोरोना चाचणी होणार

ज्या विमानाने संशयीत रुग्णाने प्रवास केला आहे. त्या विमानात त्याच्याबरोबर प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांची यादी विमान कंपनीने उपलब्ध करुन दिल्यास त्यापैकी प्रवासी कल्याण डोंबिवलीतील असल्यास त्यांचीही कोरोना चाचणी केली जाईल. कल्याण डोंबिवली महापालिका पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेनंतर तिसऱ्या लाटेकरीता यंत्रणा सज्ज आहे.  मात्र नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करणे गरजेचे आहे. महापालिकेकडे तिसऱ्या लाटेशी सामना करण्याकरिता पर्याप्त बेड, ऑक्सिनज यंत्रणा आणि आयसीयू बेड, व्हेटींलेटर बेड तयार आहेत. त्याचबरोबर कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्यावर काही कोविड रुग्णालये बंद करण्यात आली होती. त्या रुग्णालयातील यंत्रणा तशीच आहे. ती रुग्णालये पुन्हा सुरु केली जातील. नागरिकांनी विनामास्क घराबाहेर पडू नये. सोशल डिस्टसिंगचं पालन करावं. नियम मोडणाऱ्यांविरोधात महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Atul Bhatkhalkar | अधिवेशनातून सरकारला पळ काढायचा आहे, अतुल भातखळकर यांचा सरकारवर आरोप

महिलांवरील अत्याचार वाढण्यास आघाडी सरकारच जबाबदार; चित्रा वाघ यांचा जोरदार हल्लाबोल

St workers : एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचं निलंबन सुरूच, दिवसभरात हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांवर कारवाई