Atul Bhatkhalkar | अधिवेशनातून सरकारला पळ काढायचा आहे, अतुल भातखळकर यांचा सरकारवर आरोप

कोरोना विषाणूचा नवा प्रकार आणि अधिवेशन हा योगायोग आहे. मात्र, संसदेचं अधिवेशन पूर्ण वेळ सुरु आहे. त्यामुळे या सरकारला पूर्णकाळ अधिवेशन घ्यायला काहीच हरकत नव्हती. मुंबई आणि नागपूर दोन्ही विधिमंडळात सोशल डिस्टन्सिंग पाळून बसण्याची आसनव्यवस्था आहे. मात्र, या सरकारला केवळ पळ काढायचा आहे, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.

राज्याचं हिवाळी अधिवेशन केवळ 5 दिवसांचं असणार आहे. तसंच हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विमानातून प्रवास करण्यास मनाई करण्यात आल्याने यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. शिवाय मार्चमध्ये विशेष बाब म्हणून नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.

कोरोना विषाणूचा नवा प्रकार आणि अधिवेशन हा योगायोग आहे. मात्र, संसदेचं अधिवेशन पूर्ण वेळ सुरु आहे. त्यामुळे या सरकारला पूर्णकाळ अधिवेशन घ्यायला काहीच हरकत नव्हती. मुंबई आणि नागपूर दोन्ही विधिमंडळात सोशल डिस्टन्सिंग पाळून बसण्याची आसनव्यवस्था आहे. मात्र, या सरकारला केवळ पळ काढायचा आहे, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI