मोदी सरकारने अगोदरचे निर्णयही नजरचुकीनेच घेतलेत का; जयंत पाटलांचा खोचक सवाल

| Updated on: Apr 01, 2021 | 4:16 PM

केंद्रातील भाजप सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. | small saving schemes

मोदी सरकारने अगोदरचे निर्णयही नजरचुकीनेच घेतलेत का; जयंत पाटलांचा खोचक सवाल
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई: अल्पबचत योजनांच्या व्याजदर कपातीच्या निर्णयावरून मोदी सरकारने घुमजाव केल्याचे पडसाद राज्यातही उमटत आहेत. केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीने घेतले होते का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने विविध अल्पबचत योजनांवरील (small saving schemes) व्याजाच्या दरात कपात केली. त्यानंतर लगेचच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही कपात मागे घेत यु-टर्न घेऊन सारवासारव केली होती. यावर जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे निशाणा साधला. (NCP leader Jayant Patil on Modi govt cancels Small Savings Scheme intrest rate order)

केंद्रातील भाजप सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली असून कोट्यवधी ठेवीदारांची केंद्र सरकारने थट्टा केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

‘अधिकाऱ्यांच्या नजरचुकीमुळे मोदी सरकारने ‘तो’ आदेश काढला’

अल्प बचतीच्या सरकारी योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा आदेश हा अधिकाऱ्यांच्या नजरचुकीमुळे काढला गेला, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी दिले आहे. सीतारामन पुढील आर्थिक वर्षासाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदर ‘जैसे थे’ राहणार आहेत. नजरचुकीने काढले गेलेले हे आदेश मागे घेण्यात येत आहेत, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकारने बुधवारी रात्री अल्प बचत योजनांवरील (Small Savings Scheme) व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सामान्य गुंतवणुकदारांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे काल रात्रीपासून या निर्णयाची प्रचंड चर्चा रंगली होती. अखेर रात्रभरात चक्रे फिरली आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सकाळी 7.54 मिनिटांनी ट्विट करून हा आदेश रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे सामान्य गुंतवणुकदारांचा जीव भांड्यात पडला.

‘निवडणुकीत फटका बसेल या भीतीपोटीच मोदी आणि शाहांनी एका रात्रीत ‘तो’ निर्णय फिरवला’

सामान्य गुंतवणुकरांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अल्पबचत योजनांच्या (small saving schemes) व्याज दर कपातीचा निर्णय मोदी सरकारने निवडणुकीत फटका बसेल, या भीतीपोटीच मागे घेतला, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह ( यांनी केले. त्यासाठी धन्यवाद. पण निर्मला सीतारामन यांनी पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यावर व्याजदर पुन्हा घटवणार नाही, असे आश्वासनही द्यावे, अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली.

संबंधित बातम्या :

‘निवडणुकीत फटका बसेल या भीतीपोटीच मोदी आणि शाहांनी एका रात्रीत ‘तो’ निर्णय फिरवला’

अधिकाऱ्यांच्या नजरचुकीमुळे मोदी सरकारने ‘तो’ आदेश काढला; निर्मला सीतारामन यांची सारवासारव

छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला मागे, निर्मला सीतारमण यांची माहिती

(NCP leader Jayant Patil on Modi govt cancels Small Savings Scheme intrest rate order)