मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये असणारे खडसे आज कुठे येऊन पडलेत?; भाजप नेत्यानं एकनाथ खडसे यांना जागा दाखवून दिली

| Updated on: Mar 11, 2023 | 8:12 PM

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचे राजकी वैर राज्याला माहिती आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचा पराभव करण्यासाठी गिरीश महाजन यांनी जोरदार राजकीय फिल्डिंग लावली होती.

मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये असणारे खडसे आज कुठे येऊन पडलेत?; भाजप नेत्यानं एकनाथ खडसे यांना जागा दाखवून दिली
Follow us on

जळगाव: आजच्या दिवस राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेचा ठरला आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कर्जत, पुणे दौरा तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीकडून दुसऱ्यांदा टाकलेली धाड तर दुसरीकडे जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत
राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे समर्थक संजय पवार यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

तर एकनाथ खडसे यांचे समर्थक असलेल्या ॲड. रवींद्र पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यावरून आता जळगावमध्ये जोरदार राजकीय उलधापालथींना वेग आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचा जळगाव जिल्हा बँकेत पराभव झाल्यामुळे आता मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचे राजकी वैर राज्याला माहिती आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचा पराभव करण्यासाठी गिरीश महाजन यांनी जोरदार राजकीय फिल्डिंग लावली होती.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचा पराभव झाल्या नंतर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, माणूस हवेत उडायला लागला की, तो जोरात खाली आपटतो अशी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे.

यावेळी गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर हल्लाबोल करताना म्हणाले की, सर्व ठिकाणी मी हा एकनाथ खडसे यांचा अहंकार जास्त झाला होता तो अहंकार आजच्या निवडणुकीत उतरवला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांचा बाहुबली असा उल्लेख करत बाहुबली म्हणून घेणाऱ्या एकनाथ खडसे यांना आम्ही जागा दाखवून दिली आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

जळगाव बँकेच्या टीकेवरून त्यांनी थेट एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते मात्र मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये असणारे खडसे आज कुठे येऊन पडलेत अशी खोचक टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.