एल्गारवर राष्ट्रवादीची भूमिका बदलतेय? आव्हाड म्हणतात, त्या वक्तव्याची चौकशी कराच!

| Updated on: Feb 02, 2021 | 5:19 PM

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एल्गार परिषेदत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करायलाच हवी असं म्हटंलं आहे. Jitendra Awhad Elgar Parishad

एल्गारवर राष्ट्रवादीची भूमिका बदलतेय? आव्हाड म्हणतात, त्या वक्तव्याची चौकशी कराच!
जितेंद्र आव्हाड
Follow us on

मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एल्गार परिषेदत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करायलाच हवी असं म्हटंलं आहे. भावना दुखावणाऱ्या कोणत्याही वक्तव्याला माफी नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. पुण्यात 30 जानेवारीला झालेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी यानं केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आव्हाड यांनी ट्विट करुन भावना दुखावणाऱ्या वक्तव्याला माफी नाही, असं म्हटलंय. जितेंद्र आव्हाडांनी घेतलेल्या भूमिकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसची एल्गार परिषदेबाबतची भूमिका बदललीय का हे पाहावं लागेल. (Jitendra Awhad said investigation should done in Elgar Parishad provocative statements)

जितेंद्र आव्हाडांचे ट्विट

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत एल्गार परिषदेत झालेल्या प्रकारावर बद्दल भूमिका मांडली. तर दुसरीकडे भाजपदेखील या प्रकरणी आग्रमक झाले आहे. भाजपकडून राज्यभर शरजिल उस्मानीविरोधात गुन्हे दाखल करणार आहेत. भाजप आमदार राम कदम, अतुल भातखळकर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी पत्र लिहिलय.

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. शरजिल उस्मानी याने पुण्यात 30 जानेवारील रोजी एल्गार परिषदेत समस्त हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्य आणि त्याच्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करण्याची गरज, अशा विषयावर फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्वावर शिंतोडे उडवतो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करुन, शरजिलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करुन त्याला अद्दल घडवाल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या:

हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार

हिंदू समाज सडका झालाय म्हणणारा शरजिल उस्मानी कोण आहे?

शिवरायांच्या महाराष्ट्रात हे कसं खपवून घेणार? शरजिल उस्मानीबाबत फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

(Jitendra Awhad said investigation should done in Elgar Parishad provocative statements)