चोरी केली तर हिशेब द्यावाच लागेल, सोमय्यांचा राऊतांवर हल्लाबोल सुरुच

| Updated on: Dec 28, 2020 | 12:10 PM

"चोरी केली तर हिशोब द्यावाच लागेल," असं टीकास्त्र किरीट सोमय्यांनी ईडीच्या नोटिशीवरुन संजय राऊतांवर सोडलं आहे. (Kirit Somaiya Sanjay Raut)

चोरी केली तर हिशेब द्यावाच लागेल, सोमय्यांचा राऊतांवर हल्लाबोल सुरुच
संजय राऊत- किरीट सोमय्या
Follow us on

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्यांनी ईडीच्या नोटिशीवरुन शिवसेना खासदार यांच्यावर टीका केली आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी एचडीआयएलसोबत संजय राऊत यांचा संबंध काय?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. तर, चोरी केली तर हिशोब द्यावाच लागेल, असं टीकास्त्र सोमय्यांनी राऊतांवर सोडलं आहे. संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीच्या समन्सवर बोलताना किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रताप सरनाईक यांच्यावरही निशाणा साधला आहे. (Kirit Somaiya criticize Sanjay Raut after ED notice in PMC bank case)

ईडीचं राजकारण नाही अर्थकारण

पीएमसी बँग पूनर्जिवीत करण्यासाठी इडीकडून ही कारवाई आहे. हे राजकारण नसून अर्थकारण आहे. “हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने पीएमसी बँकेत साडे पाच हजार कोटींचा घोटाळा झाला, पैसे वसूल करा”, असा आदेश दिला असल्याचं सोमय्या म्हणाले. “पीएमसी बँकेतील पैसे एचडीआयएलच्या खात्यातून प्रवीण राऊत, त्यांच्याकडून माधुरी राऊत आणि मग तिथून वर्षा संजय राऊत यांच्या खात्यात ट्रांसफर झाले”, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

संजय राऊत का घाबरतात? प्रामाणिक असाल तर टेंशन घेऊ नका?

“शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर चिठ्ठी लिहीतात की पीएमसी बँकेत त्यांचे कोटी रुपये पैसे फसले तर दुसरीकडे संजय राऊत यांच्या खात्यात हे पैसे जातात”. चूक केलीये तर हिशोब तर द्यावाच लागेल, असा इशारा किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांना दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांचे संबंध काय? तसंच संजय राऊत आणि एचडीआयएलचे संबंध काय हे त्यांनी स्पष्ट करावं, असं आव्हानही किरीट सोमय्यांनी दिलं आहे.10 लाख डिपाझिटर्सना वाचवण्यासाठी ईडी जर काम करत असेल तर वाईट काय ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. प्रताप सरनाईक यांनी मला १०० कोटींची नोटीस पाठवली आणि म्हणतात की आम्ही घाबरत नाही. “चोरी केली आत्ता हिशोब द्या”, असं आव्हान किरिट सोमय्यांनी दिलंय.

“प्रताप सरनाईक यांच्या खात्यात 2014 साली एनएसडीएल घोटाळा झाला, अडीचशे कोटी प्रताप सरनाईकांच्या खात्यात गेले कसे यांची चौकशी होणार आहे”. टिटवाळ्यात 112 सातबारा आहेत, त्याचीही चौकशी होणार आहे. “ईडीने क्लॅरिफिकेशन मागितलं म्हणजे तुम्ही चोर असं नसतं, कारवाई होणारच,” राऊत कुटुंबीय एचडीआयएलचं पीआर करत होते का? ही माहfती त्यांना द्यावीच लागेल, असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीचे समन्स आल्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर, संजय राऊत यांनी देखील “कालपासून ईडीचा माणूस आला नाही, भाजप कार्यालयात माझा माणूस पाठवलाय, असा टोला भाजपला लगवाला होता.

संजय राऊतांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक

संबंधित  बातम्या:

“लाभार्थ्यांना उत्तर द्यावेच लागेल,” किरीट सोमय्यांचा राऊतांवर हल्लाबोल

Varsha Sanjay Raut | वर्षा संजय राऊत यांची ईडी चौकशी का? वाचा सविस्तर

(Kirit Somaiya criticize Sanjay Raut after ED notice in PMC bank case)