Kirit Somaiya INS Vikrant Case: अन् नॉट रिचेबल सोमय्या मुंबई विमानतळावर अवतरले, चौकशीच्या फेऱ्यात तीन नेत्यांची नावं घेतली

सेशन कोर्टात त्यांची निराशा झाली कारण सेशन कोर्टाने सोमय्या यांना दणका देत त्यांचा व त्यांच्या मुलाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर मात्र सोमय्या यांनी हायकोर्टात धाव घेतली हायकोर्टात मात्र किरीट सोमय्या यांना दिलासा मिळाला. सोमय्यांचा अटकपूर्व जामीन हाय कोर्टानं मजूर केला.

Kirit Somaiya INS Vikrant Case: अन् नॉट रिचेबल सोमय्या मुंबई विमानतळावर अवतरले, चौकशीच्या फेऱ्यात तीन नेत्यांची नावं घेतली
किरीट सोमय्यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 13, 2022 | 7:12 PM

मुंबई : गेल्या तीन चार दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे नॉटरिचेबल होते. कारण आयएनएस विक्रांत प्रकरणात (INS Vikrant Case) किरीट सोमय्या आणि मुलागा नील सोमय्या (Neil Somaiya) यांना पोलिसांनी समन्स बजावला होता. किरीट सोमय्या यांनी अटपूर्व जामीनासाठी धावाधावही सुरू केली. मात्र सेशन कोर्टात त्यांची निराशा झाली कारण सेशन कोर्टाने सोमय्या यांना दणका देत त्यांचा व त्यांच्या मुलाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर मात्र सोमय्या यांनी हायकोर्टात धाव घेतली हायकोर्टात मात्र किरीट सोमय्या यांना दिलासा मिळाला. सोमय्यांचा अटकपूर्व जामीन हाय कोर्टानं मजूर केला. त्यानंतर नॉटरिचेबल असणारे किरीट सोमय्या थेट मुंबई विमान तळावर अवतरले. आणि पुन्हा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला. तसेच महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांचा लवकच पुढे चौकशीसाठी नंबर लागणार आहे. असेही त्यानंनी सांगितले.

तीन नेत्यांची नावं सांगितली

त्यात पहिलं नावं त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचं घेतलं. तर दुसरं नाव हे यशवंत जाधव यांचं सांगितलं. तर तिसरा नंबर हा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा लागेल, असेही सांगितले. त्यामुळे आता सोमय्यांचा हा दावा किती खरा ठरतो ते येणारा काळच सांगेल.मात्र सोमय्या माध्यमांसमोर येताच पुन्हा आक्रमक झालेत एवढं मात्र नक्की. 50 कोटीची भाषा राऊतांनी वापरली होती. मात्र एका दमडीचाही घोटाळा झाला नाही. आम्ही न्यायमूर्तीचे धन्यवाद मानतो. एक कागद नाही, पुरावा नाही, स्टंटबाजी करायची, अटेन्शन मिळवायचं, न्याय मिळायची सुरुवात झाली आहे, असे सोमय्या म्हणाले.

मास्टरमाईंड ठाकरे आहेत-सोमय्या

तसेच हे जे नाटक चाललेलं होतं, चार पाच दिवस. ते उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं. संजय राऊत प्रवक्ता आहेत. मास्टरमाईंड ठाकरे आहेत. बायको मुलांचे घोटाळे बाहेर आल्यानंतर याला जेलमध्ये टाका, अडकवा, असा कट रचलेला आहे, असा थेट आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. तसेच आज मुख्यमंत्री मंत्रालयात गेले होते, त्याबाबत सोमय्यांना विचारले असता, नंदकिशोर चतुर्वेदीकडून झालेली वसुली पहायला गेले असतील असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे. तर या घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांच्यावर झाल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत रोज सोमय्या यांच्यावर आरोप करत आहेत.

Raj Thackeray Vs Jitendra Awhad : बाबासाहेब पुरंदरेंनी चुकीचा इतिहास सांगितला, पान नंबर सांगा ना? राज ठाकरेंना आव्हाडांनी पान नंबर तर सांगितलंच पण उताराही

Chandrakant Patil: राज ठाकरेंच्या आधीपासून आम्ही हिंदुत्वाचे मुद्दे मांडतोय; चंद्रकांत पाटलांच्या टोल्याचा नेमका अर्थ काय?

Cm Uddhav Thackeray मंत्रालयात येताच मुख्यमंत्र्यांचा कामाचा धडाका, कोस्टल रोडचाही घेतला आढावा