मंत्रालयात प्रताप सरनाईकांची फाईल बघायला गेलो, माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवा, सोमय्यांचं ओपन चॅलेंज

| Updated on: Jan 28, 2022 | 2:52 PM

मी प्रताप सरनाईकांची (Pratap Sarnaik) फाईल बघायला मंत्रालयात गेलो, प्रताप सरनाईकांनी चोरी, लबाडीने बांधकाम केलं, त्यांना दंड माफ केला, ती फाईल बघायला मी चौथ्या मजल्यावर गेलो होतो असे सोमय्या छातीठोकपणे सांगत आहेत.

मंत्रालयात प्रताप सरनाईकांची फाईल बघायला गेलो, माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवा, सोमय्यांचं ओपन चॅलेंज
किरीट सोमय्या
Follow us on

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) हे ठाकरे सरकारवर (Cm Uddhav thackeray) टीका करण्यात नेहमीच आघाडीवर असतात. आता किरीट सोमय्या मंत्रालयातील त्या फोटोवरून चर्चेत आलेत. किरीट सोमय्यांना बजावल्यावरू सोमय्या आक्रमक झाले आहेत. मंत्रालयात माझा फोटो काढण्यासाठी जो माणूस आला होता, उद्धव ठाकरेंचा माणूस होता, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. मी प्रताप सरनाईकांची (Pratap Sarnaik) फाईल बघायला मंत्रालयात गेलो, प्रताप सरनाईकांनी चोरी, लबाडीने बांधकाम केलं, त्यांना दंड माफ केला, ती फाईल बघायला मी चौथ्या मजल्यावर गेलो होतो असे सोमय्या छातीठोकपणे सांगत आहेत. तसेच त्यावेळी सरनाईकांना आत येण्यासाठी मुभा कशी दिली गेली? असा सवालही सोमय्या यांनी विचारला आहे. मी वाट पाहतोय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना चॅलेंज, हिंमत असेल तर माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे खुले आवाहन सोमय्यांनी ठाकरेंना दिलंय.

प्रताप सरनाईक मंत्रालयात कसे आले?

चौथ्या मजल्यावर फोटो काढणाऱ्या प्रताप सरनाईकांना नोटीस का नाही दिली? प्रताप सरनाईक आत आले कसे ? मी फाईल बघायला येणार हे प्रताप सरनाईकला कस कळल ? ज्याने फोटो काढले त्यावर अद्याप कारवाई का नाही ? असे एक ना अनेक सावल सोमय्या यांनी ठाकरेंना विचारले आहेत. मंत्रालयात किरीट सोमय्या गेल्यावर गुंड प्रताप सरनाईकला माझ्या मागे पाठवता, अशी गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही, असेही सोमय्या म्हणाले आहेत, तसेच अनिल परब यांची खुर्ची धोक्यात आहेच, याचे परिणाम लवकरच दिसतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री कुठे ?

बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री कुठे ? असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही खिल्ली उडवली आहे. लिपीकावर आणि टायपिस्टवर कसली कारवाई करताय? असा सवाल त्यांनी विचारला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना माफी मागावी लागणार, अशी मागणीही त्यांनी केलीय. तसेच कोणत्या कायद्याअंतर्गत मला नोटीस पाठवली? ठाकरे सरकारची दादागिरी की ठोकशाही? काही दिवसांपुर्वी मी मुख्यमंत्री कार्यालयातल्या फाईल ही मी पाहून आलोय. सचिन वाझेच्या फाईलही मी पाहून आलो आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांनी मला खुर्ची दिली तर या सगळ्यांवर कारवाई करणार का ? उद्धव ठाकरे हे आता इंग्रजांच्या प्रथा लावणार का ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच इथे विषय खुर्चीचा नाही तर 18 कोटी रूपये जनतेचे गेले त्याचा आहे. मंत्रालय कोणाच्या बापाची मालकी नाहीये, फाईलच अवलोकन करायला कोणीही जाऊ शकतं, याबद्दल मरिन ड्राईव्ह पोलिस स्टेशनला तक्रार केली, केंद्र सरकारच्या गृहसचिवांकडे ही तक्रार केली आहे. मला नोटीस पाठवून माहिती अधिकार कायद्याचा भंग केला आहे, ताबडतोब नोटीस मागे घ्यावी आणि माफी मागावी, असेही सोमय्या म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या म्हणाले, जय पवार यांचे कारनामे उघड करणार; अजित पवार म्हणतात, महत्त्व देण्याची गरज नाही

‘बेवड्यांना समर्पित सरकार’, मुनगंटीवारांचा हल्लाबोल; तर ‘सरकारला शेतकऱ्यांची नाही, बेवड्यांची काळजी’ दरेकरांचाही घणाघात

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा