
मुंबई, दि. 9 जानेवारी 2024 | देशात पहिली बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. या ट्रेनचा पहिल्या आणि महत्वाचे टप्प्याचे काम ८ जानेवारी रोजी पूर्ण झाले. या कामासाठी सुमारे वर्षभराचा कालावधी लागला. देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे १०० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. यामुळे बुलेट ट्रेन रुळावर येण्याचे काम लवकरच होणार आहे. कारण भूसंपादनापैकी १.१२ टक्के जागा संपादीत करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला. भूसंपादनाचे काम पूर्ण होताच नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून कामाला गती देण्यात आली आहे. वंदे भारत या सेमी हायस्पीड ट्रेननंतर देशात बुलेट ट्रेन धावणार आहे.
देशात पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१६ मध्ये नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना केली. देशभरात बुलेट ट्रेनचे जाळे बनविण्यासाठी, प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणी करण्याचे काम या कंपनीकडे सोपवले. या कंपनीकडून बुलेट ट्रेनचे काम सुरु करण्यात आले. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकल्पाची विविध काम सुरु केली. परंतु या प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यास विलंब होत होता. एकाच वेळी महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा नगर हवेलीमधील जमीन संपादनाचे काम सुरु होते. काही ठिकाणी भूसंपादनासाठी अडचणी येत होत्या. अखेर जानेवारी २०२४ मध्ये ठाणे जिल्ह्यातील काही भागातील जागा संपादित करण्यात आली. त्यानंतर राज्यातीलही १०० टक्के जमीन नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला देण्यात आली. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेपैकी १.१२ टक्के जागा ताब्यात घेणे बाकी होते. ते कामही पूर्ण झाले.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ८ जानेवारी २०२४ पर्यंत महाराष्ट्र, गुजरात, दादरा-नगर हवेली येथील १,३८९.४९ हेक्टर जागा ताब्यात घेण्यात आली आहे, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात आली. बुलेट ट्रेनसाठी २१ किमी लांबीचा वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाटा बोगदा करण्यात आला आहे. एकूण २१ किमी बोगद्यापैकी ठाणे खाडीतील ७ किमीचा बोगदा समुद्राखाल आहे. इतक्या लांबीचा देशातील हा पहिला बोगदा आहे. बुलेट ट्रेनसाठी आरसी ट्रॅक बेड टाकण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी सुरत आणि आणंद ट्रॅक तयार होत आहे. देशात प्रथमच खडीविरहित ट्रचा वापर केला जात आहे.