Driving Licence : लायसन्सचा डमी खेळ खल्लास! लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ‘आर्टीफिशियल इंटेलिजन्सचं तंत्र, टेस्टला डमी बसविणे आता अशक्य

संगणकाचा वेब कॅमेरा ऑन झाल्यावर उमेदवाराला हळूच बाजूला करीत दलाल लोकच स्वत: चाचणी द्यायचे. मात्र, आता स्क्रिनवर जरा जरी हालचाल झाली तरी चाचणीची ऑनलाइन संगणकीय प्रक्रिया आपोआप बंद होईल.

Driving Licence : लायसन्सचा डमी खेळ खल्लास! लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 'आर्टीफिशियल इंटेलिजन्सचं तंत्र, टेस्टला डमी बसविणे आता अशक्य
सांकेतिक छायाचित्र Image Credit source: driving-tests.org
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 7:43 AM

मुंबई : कोरोनाकाळात (Corona) अनेक ठिकाणी बदल करण्यात आले. अनेक ठिकाणच्या वेळा बदलल्या. कोरोना निर्बंधात जाता येत नसल्याने परिवहन विभागाने ऑनलाइन शिकाऊ चालक परवाना (Learning Driving Licenses) देण्यासही सुरूवात केली होती. हा परवाना देताना दहावीच्या परीक्षेत (Tests) जसे डमी उमेदवार बसतात तशाच प्रकारे शिकाऊ वाहन चालकांच्या या परीक्षेत देखील गडबड होऊ लागल्याचं लक्षात आलं. त्यामुळे परिवहन विभागाने आता आर्टीफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून या फेसलेस तंत्राचे उद्घाटन आज गुरुवारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे डमी उमेदवार बसविणं आता अशक्य होणार एवढं मात्र नक्की.

राज्यभरातून तक्रारी दाखल

कोरोना लाटेत नागरिकांवर बंधने असल्याने त्यांना सोयीचे व्हावे म्हणून एप्रिल 2021 पासून शिकाऊ वाहन परवान्यासाठी घरबसल्या ऑनलाइन परीक्षा देण्याची प्रक्रिया आरटीओने सुरू केली. दलालांनी त्यावर कडी करीत स्वत:च चाचणी देऊन उमेदवारांना परीक्षेतून सूट दिली. त्यामुळे कोणलाही लायसन्स मिळू लागलं. शिकाऊ वाहन परवाना घरबसल्या मिळवा, अशा दलालांच्या जाहिरातीही निघाल्याने चिंता वाढली होती. चाचणी न देता लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स अगदी व्हॉट्सअॅपवर मिळू लागल्याने राज्यभरातून परिवहन विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

चुकीच्या हाती स्टेअरिंग

शिकाऊ वाहन परवाना हा उमेदवाराला वाहन चालविणं शिकवण्यासाठी मिळालेला असतो. त्यामुळे तो केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असतो. त्यानंतर पक्के लायसन्स बनवावे लागते. शिकाऊ व्यक्ती गाडी चालवत असताना त्याच्या शेजारी पक्के ड्रायव्हिंग लायसन्स असलेली व्यक्ती बसणं गरजेचं आहे. असं कोणालाही शिकाऊ लायसन्स मिळाल्याने चुकीच्या हाती स्टेअरिंग गेल्याने अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले होते.

डमी खेळ खल्लास

संगणकाचा वेब कॅमेरा ऑन झाल्यावर उमेदवाराला हळूच बाजूला करीत दलाल लोकच स्वत: चाचणी द्यायचे. मात्र, आता स्क्रिनवर जरा जरी हालचाल झाली तरी चाचणीची ऑनलाइन संगणकीय प्रक्रिया आपोआप बंद होईल. तसेच आधार कार्डवरील उमेदवाराच्या फोटोला ओळखूनच चाचणी सुरू होईल. त्यामुळे डमी उमेदवार चाचणीला बसण्याची शक्यता नष्ट होईल. त्यासाठी सारथी सॉफ्टवेअरमध्ये बदल केले आहेत. गुरुवारी आज प्रणाली लागू होईल, असं सूत्रांनी सांगितलं.

आज सुरुवात…

फेसलेस तंत्राचे उद्घाटन आज गुरुवारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे डमी उमेदवार बसविणं आता अशक्य होणार एवढं मात्र नक्की. यामुळे चुकीच्या गोष्टीला आळा बसेल.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.